शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

77 हजार हेक्टर क्षेत्रात होणार सोयाबीन पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2022 05:00 IST

पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी नव्या तंत्रज्ञानाची माहिती देऊन उत्पादन वाढीसाठी कृषी अधिकाऱ्यांनी  बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे. तेलंगणाच्या सीमेवरून चोरबीटी जिल्ह्यात दाखल होत असल्याची माहिती आहे. वाहतूक, साठवणूक आणि विक्रीवर प्रतिबंध ठेवण्यासाठी कृषी विभागाने अतिशय दक्षपणे काम करावे. घरगुती बियांण्यावर प्रक्रिया, उगवण क्षमता, तपासणी व प्रात्यक्षिक मेळाव्याचे तालुकास्तरावर आयोजन करावे, अशा सूचनाही मंत्री वडेट्टीवार यांनी केल्या. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात सुमारे ७७ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होणार आहे. गतवर्षी ७२२ कोटींचे पीक कर्ज वाटप झाले होते. यावर्षी ९५० कोटींच्या उद्दिष्टपूर्तीसाठी राष्ट्रीयीकृत बँकांनी योग्य नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी जिल्हा खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत केल्या. यावेळी खासदार बाळू धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार प्रतिभा धानोरकर, प्रभारी जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मित्ताली सेठी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे व सर्व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी नव्या तंत्रज्ञानाची माहिती देऊन उत्पादन वाढीसाठी कृषी अधिकाऱ्यांनी  बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे. तेलंगणाच्या सीमेवरून चोरबीटी जिल्ह्यात दाखल होत असल्याची माहिती आहे. वाहतूक, साठवणूक आणि विक्रीवर प्रतिबंध ठेवण्यासाठी कृषी विभागाने अतिशय दक्षपणे काम करावे. घरगुती बियांण्यावर प्रक्रिया, उगवण क्षमता, तपासणी व प्रात्यक्षिक मेळाव्याचे तालुकास्तरावर आयोजन करावे, अशा सूचनाही मंत्री वडेट्टीवार यांनी केल्या. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते खांबाडा येथील सुरेश गरमाडे या प्रगतिशील शेतकऱ्याचा सत्कार करण्यात आला.  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कृषी विभागाचे सादरीकरण केले. उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, शेती उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, शेतकरी उपस्थित होते. 

तीन तालुक्यांत हळदीचे क्लस्टर- भद्रावती, वरोरा व चिमूर या तालुक्यांत हळदीचे उत्पादन होते. जिल्ह्यात शेतकरी उत्पादक कंपन्या तयार होत आहे. हळद पिकाला चांगला भाव असून, पिकाच्या क्षेत्रवाढीसाठी क्लस्टर उभारण्यात येईल. याचा फायदा ब्रँडिंग व प्रोसेसिंगसाठी होईल, अशी माहिती पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दिली.

प्रायोगिक तत्त्वावर डेअरी प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर दुग्ध व्यवसायासाठी नागभीड, वरोरा, चिमूर, सिंदेवाही येथे मदर डेअरीचे प्रकल्प सुरू आहेत. या तालुक्यांत चारा लागवडीसाठीचे प्रस्ताव पशुसंवर्धन विभागाने पाठविणार आहे. महाज्योती अंतर्गत चिमूर, सिंदेवाही, भद्रावती, नागभीड व वरोरा तालुक्यांत करडई पेरा वाढविणे, ब्रँडिंग व प्रोसेसिंगसाठी युनिट उभारण्याचा यासाठी प्रस्ताव तयार केला जाणार आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार