शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
4
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
5
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
6
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
7
Operation Sindoor : जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
8
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
9
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
10
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
11
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
12
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
13
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
14
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
15
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
16
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
17
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
18
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
19
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
20
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  

सोयाबीनचे बियाणे " २६०० अन् मालाला भाव " २८००

By admin | Updated: October 27, 2014 22:33 IST

सध्या शेतामधून सोयाबीन पीक निघताना दिसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सोयाबीनचे उत्पादन घटताना दिसत आहे. याउलट शेतकऱ्यांच्या घरी माल येत असला तरी बाजारात सोयाबीनला

लखमापूर : सध्या शेतामधून सोयाबीन पीक निघताना दिसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सोयाबीनचे उत्पादन घटताना दिसत आहे. याउलट शेतकऱ्यांच्या घरी माल येत असला तरी बाजारात सोयाबीनला २५०० ते २८०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. चालु हंगामाच्या सुरुवातीला गेल्या वर्षीच्या तुलनेत ७०० ते ८०० रुपये जास्त किंमत देऊनही शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करावे लागले. गेल्या वर्षी सोयाबीनची एक बॅग १७०० ते १८०० रुपयात शेतकऱ्यांना मिळाली. त्यावेळी भाव ३२०० ते ३७०० पर्यंत मिळाला. मात्र यावर्षी २६०० ते २७०० रुपये बॅग खरेदी करुन भाव मात्र २८०० रुपयेच मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरुन निघताना दिसत नाही.साधारणत दिवाळीत सदर पीक शेतकऱ्यांच्या घरी येते. परंतु पावसाच्या हुलकावणीमुळे शेतकऱ्यांना पीक निघण्यात बरीच प्रतीक्षा करावी लागत आहे. सोयाबीन हे नगदी पीक म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणात या पिकाची लागवड करीत असतो. याचाच फायदा घेत व गेल्या वर्षीच्या अकाली पावसाचे निमित्त साधत बियाणे कंपन्यांनी पुरवठा अल्यल्प असल्याचे आधीच घोषित केले. कुठे बियाणे खरदी केल्यानंतर त्याची उगवणसुद्धा झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटकाही सहन करावा लागला. एकीकडे शेतकऱ्यांच्या घरी पीक न आल्याने दिवाळी अंधारात गेली तर दुसरीकडे आता पीक हाती येत असताना भाव नाही. अशा परिस्थितीत शेती कशी करावी, असा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. त्यातही कमी पावसामुळे सोयाबीन बियांचा आकारही कमी असून शेगांची लागण क्षमताही कमी प्रमाणात दिसून येत आहे. जमिनीत पुरेशा प्रमाणात ओल नसल्याने दरवर्षी रबी हंगामात गहु, हरभरा आदी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची आशा आता मावळली आहे. रबी पिके कोरडवाहू जमिनीत बरेच शेतकरी घेतात. मात्र यावर्षी शेतजमिनीवर रबी पिकांची लागवड होणे अवघड दिसत आहे. (वार्ताहर)