शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

नकोसा वाटणारा उन्हाळा काहींना वाटतो हवाहवासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:17 IST

उन्हाळ्याला सुरुवात होताच कुलर, माठ, रेफ्रीजरेटर, टोपी, गॉगल्स, दुपट्टे, सनकोट, सुती कपडे यांचा वापर सुरु होतो. तापमानामुळे अंगाची लाही-लाही होत असताना कुलरची जाणीवही तेवढ्याच तीव्रतेने होते. उन्हाळ्याच्या दिवसातील साधने ज्याप्रमाणे आपल्याला सुखद दिलासा देतात, तसेच ते बेरोजगारांच्या हाताला काही काम मिळवून देतात.

ठळक मुद्देरस्त्याच्या कडेला दुकाने : ऋतुनुसार व्यवसायालाही मिळते चालना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : उन्हाळ्याला सुरुवात होताच कुलर, माठ, रेफ्रीजरेटर, टोपी, गॉगल्स, दुपट्टे, सनकोट, सुती कपडे यांचा वापर सुरु होतो. तापमानामुळे अंगाची लाही-लाही होत असताना कुलरची जाणीवही तेवढ्याच तीव्रतेने होते. उन्हाळ्याच्या दिवसातील साधने ज्याप्रमाणे आपल्याला सुखद दिलासा देतात, तसेच ते बेरोजगारांच्या हाताला काही काम मिळवून देतात. उन्हाळ्याने रोजगारांच्या नवीन संधी उपलब्ध करुन दिल्याचे चित्र सध्या दिसत आहे.कुलरची दुरुस्ती करणे, कुलरकरिता ताट्या बनवून त्यांची विक्री करणे, त्यांची देखभाल करणे, माठ विकणे, टोपी, गॉगल्स, दुपट्टे विकणाऱ्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या साधनांच्या विक्रीवर चालतो. रखरखते ऊन आणि वातावरणातील कोरडेपणा यामुळे अनेकांना उन्हाळा रटाळ वाटतो. मात्र यापैकी काहींना उन्हाळ्याची कायमच प्रतीक्षा असते.हाताला काम आणि पोटाला भाकर मिळेल या आशेने त्यांच्यात नवा उत्साहही संचारतो. शहरात इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीची मोठी दुकाने आहेत. काही कारणास्तव या वस्तूत बिघाड झाल्यास इलेक्ट्रिशियनची मदत घेतली जाते व उन्हाळा संपला की, घरोघरी कुलर बांधून ठेवले जाते. मात्र नव्याने कुलर सुरु करण्यापूर्वी त्यांचे काही ना काही दुरुस्तीचे काम निघतेच, अशा वेळी इलेक्ट्रीकल्सची मदत घेतल्याशिवाय गत्यंतर नसते. आता या दुरुस्ती करणाºया कामगारांच्या शोध घेण्याची गरज पडत नाही. आयटीआय यसारख्या संस्थेतून प्रशिक्षण घेतलेले अनेक तरुण घरोघरी जाऊन काही दुरुस्तीचे काम आहे काय? अशी विचारणा करतात. याशिवाय काही कन्सल्टन्सी सर्वीसेसकडून या प्रकरची सेवा पुरविली जाते. त्यामुळे तरुणांना रोजगारही मिळतो व शोध कार्य न करता घरपोच सेवाही मिळते. उन्हाळ्यात कार्यालयातील वातानुकूलीत यंत्रणेच्या दुरुस्तीची कामे या कारागिरांना मिळतात. शिवाय कुलरसाठी लागणाºया ताट्या बनविणारे अनेक कारागीर छोटेखानी स्वरुपातील दुकाने रस्त्याच्या कडेला थाटतात.यातून त्याची दिवसाला बºयापैकी मिळकत होते, सर्वसामान्यांना नकोसा वाटणारा उन्हाळा एकीकडे या होतकरु तरुणांना रोजगार मिळवून देत असल्याने हवाहवासा वाटतो. त्यामुळे दुरुस्तीची कामे बेरोजगारांकडून करून घेतल्यास त्यांनाही मदत होईल.लग्नसराई ठरते पर्वणीचउन्हाळा सुरु होताच लग्नाची धामधूम असते. यातूनही मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत असून अनेक तरुणांच्या हाताला काम मिळते, बुफे संस्कृती रुजलेली असल्याने कॅटरर्सकडे जेवणाचे कंत्राट दिले जाते. तिथे पाहुण्यांना अन्न वाढणारे अनेक मुले-मुली दृष्टीस पडतात. शिक्षणासोबतच कमाईचे चांगले साधन म्हणून या क्षेत्राकडे पाहिले जाते. लग्न समारंभ साजरा करताना सजावट, पाहुण्यांचे स्वागत, जेवणाची व्यवस्था, सर्व बारिकसारीक गोष्टींचे व्यवस्था पाहतात. हा एक नवा उद्योग उदयास आला असून यातून अनेकांना रोजगार मिळाला.माठ विक्रीतून कमाईरेफ्रिेजरेटरचा वापर घरोघरी केला जात असला तरी माठ आजही आपले स्थान राखून आहे. त्यामुळे उन्हाळ्यात आवर्जून माठ खरेदी केले जातात. कुंभारांनी बनविलेले माठ विकत घेऊन त्यांची विक्री करणारे अनेक किरकोळ विक्रेते रस्त्याच्या कडेला सध्या दिसत आहेत.

टॅग्स :Temperatureतापमान