शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ वाघिणीचा लवकरच बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 22:51 IST

वनपरिक्षेत्र कार्यालय तळोधी (बा.) अंतर्गत येणाऱ्या गिरगाव व परिसरात गेल्या १०-११ दिवसांपासून वाघिणीने तीन बछड्यासह बस्तान मांडले आहे. पाळीवर जनावरे, शेतकऱ्यांवर ही वाघीण हल्ला करीत आहे.

ठळक मुद्देभ्रमणध्वनीवरून साधला संवाद : पालकमंत्र्यांनी दिले आश्वासन

आॅनलाईन लोकमततळोधी/गिरगाव : वनपरिक्षेत्र कार्यालय तळोधी (बा.) अंतर्गत येणाऱ्या गिरगाव व परिसरात गेल्या १०-११ दिवसांपासून वाघिणीने तीन बछड्यासह बस्तान मांडले आहे. पाळीवर जनावरे, शेतकऱ्यांवर ही वाघीण हल्ला करीत आहे. दरम्यान, रविवारी गिरगाव येथील ग्रामस्थानी भ्रमनध्वनीवरून राज्याचे वनमंत्री व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संपर्क साधून आपली व्यथा मांडली. त्यानंतर वाघिणीचा लवकरच बंदोबस्त करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. तसे आदेश वनविभागालाही दिले.गेल्या १०-११ दिवसांपासून वाघीण व तीन बछडे गिरगाव परिसरात वास्तव्यास आहेत. गेल्या दहा दिवसात वाघिणीने तीन शेतकºयांवर हल्ले केले. तसेच एक गोºहा व एक गाय मारली. त्यामुळे सध्या परिसरात वाघिणीची मोठी दहशत माजली आहे. सध्या शेतात जाणे शेतकºयांना कठीण झाले आहे. वाघिणीचे व तिच्या बछड्याचे वारंवार दर्शन होत असल्याने शेतकरी भयभीत झाले असून शेतावर जाणे अनेकांनी बंद केले आहे.वाघिणीला बेशुद्ध करुन तिला दुसºया ठिकाणी नेण्यासंदर्भात येथील वनाधिकाºयांनी वरिष्ठांना परवानगी मागितली आहे. एनटीपीसीकडे तसा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.दरम्यान, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार रविवारी गिरगाव येथे जि.प. सदस्य तथा सभापती ब्रिजभूषण पाझारे, जि.प. सदस्य संजय गजपुरे, स्विय सहाय्यक सुहास अलमस्त यांनी गावकºयांसोबत एक बैठक घेतली. गिरगाव येथील सरपंच रुपेश गायकवाड, उपसरपंच शरद सोनवाने, विनोद बोरकर, जि.प. सदस्य नैना गेडाम, वनपरिक्षेत्र अधिकारी अभिलाषा सोनटक्के, राधेशाम जयस्वाल, गीता बोरकर, रमेश बोरकर यावेळी उपस्थित होते. या बैठकीत गावकºयांच्या सूचना ऐकून घेतल्या. त्यानंतर यावर काय उपाययोजना करता येईल, मासंदर्भात चर्चा झाली. त्यानंतर ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधण्यात आला. यावेळी वाघिणीचा लवकरच बंदोबस्त केला जाईल, असे आश्वासन ना. मुनगंटीवार यांनी गावकºयांना दिले. वनविभागाला या संदर्भात सूचनाही दिल्या.