शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

सास्ती, कोलगावच्या प्रकल्पग्रस्तांना लवकरच न्याय

By admin | Updated: May 2, 2017 01:01 IST

जिल्ह्यातील सास्ती येथील भूमिगत कोळसा खाण, कोलगाव कोळसा खाण आदींच्या प्रकल्पग्रस्तांना मोबदला ...

नागपुरात बैठक : केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार निर्णयचंद्रपूर : जिल्ह्यातील सास्ती येथील भूमिगत कोळसा खाण, कोलगाव कोळसा खाण आदींच्या प्रकल्पग्रस्तांना मोबदला व नोकरी देण्यासंदर्भात वेस्टर्न कोल्ड फिल्डच्या नागपूर येथील मुख्यालयात नुकतीच बैठक झाली. या प्रश्नावर लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन वेकोलितर्फे देण्यात आले आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या निर्देशानुसार निर्णय घेण्याबाबत वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी सहमती दर्शविली आहे.सास्ती व कोलगाव कोळसा खाणीच्या प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. या संदर्भात ना. अहीर यांनी गंभीर दखल घेऊन वेकोलि अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर गेल्या आठवड्यात वेकोलिच्या नागपूर येथील मुख्यालयात या प्रश्नावर बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीमध्ये वेकोलिचे कार्मिक निदेशक डॉ. संजीव कुमार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी हे प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याबाबत वेकोलि विचार करीत असल्याने स्पष्ट केले. डॉ. संजीव कुमार यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांना दोन्ही प्रकल्पाबाबत आणि प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यावर आश्वास्त करण्यात आल्याची माहिती बैठकीमध्ये दिली. सास्ती भूमिगत खाण ते खुल्या खाणीच्या प्रकल्पग्रस्तांचा मोबदला आणि नोकरी देण्याचा विषय वेकोलिच्या व्यवस्थापन मंडळात मांडण्यात आला आहे. ना. अहीर मोबदला आणि नोकरीबाबत जे निर्देश देतील, त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल. हे प्रकल्प सुरू करण्यासाठी वेकोलिच्या व्यवस्थापनाकडून लवकरच सकारात्मक कार्यवाही केली जाणार आहे. या बैठकीला भाजपा जिल्हा सरचिटणीस राहुल सराफ, सास्ती-गोवरीचे जिल्हा परिषद सदस्य सुनील उरकुडे, कोलगावचे सरपंच पुरूषोत्तम लांडे, यवतमाळचे माजी जि.प. सदस्य विजय पिदूरकर, राजुरा तालुका महामंत्री अ‍ॅड. प्रशांत घरोटे, भाजपा किसान आघाडीचे राजू घरोटे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)