निवडणुकीच्या काळात मनसोक्त रेती उत्खननाच्या रेती तस्कराच्या योजनेवर पाणी फेरले. गुरुवारी पहाटे एसडीओ यांनी धडाकेबाज कारवाई करून २४ ट्रॅक्टर रेती घाटावरून जप्त करून तलाठी कार्यालयात लावले. आज ग्रामपंचायतीच्या निवडणूक व १८ जानेवारीला मतमोजणीपर्यत महसूल विभागाचे अधिकारी व्यस्त असणार. त्यामुळे याचा फायदा घेत नेहमीपेक्षा अधिक जोमाने अवैध रेती उत्खनन करण्याच्या तस्करांच्या मनसुब्यावर या कारवाईमुळे पाणी फेरले. छापामारीदरम्यान एकाच मालकाचे दोन-दोन, चार-चार ट्रॅक्टर सापडल्याने त्यांचा व्यवसायच बंद पडला आहे. दंड कसा भरावा, या विवंचनेत सापडले आहे. या कारवाई या क्षेत्रातील अर्ध्यापेक्षा अधिक ट्रॅक्टर सापडल्याने दररोज रात्रंदिवस होणारी वर्दळ कमी झाली आहे. त्यामुळे गावातून होत असलेले ध्वनी प्रदूषणही कमी झालेले दिसले.
कारवाई होताच रेती तस्करीची वर्दळ अचानक कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:33 IST