शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

गावचा मुलगा मुख्यमंत्री झाला !

By admin | Updated: October 29, 2014 22:46 IST

राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मूल हे गाव म्हणजे भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आजोळ! महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी आरुढ होणारे या गावातील ते दुसरे मुख्यमंत्री असतील.

मूलमध्ये आनंदोत्सव : गावात अपूर्वाईचा जल्लोषराजू गेडाम - मूलराजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मूल हे गाव म्हणजे भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आजोळ! महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी आरुढ होणारे या गावातील ते दुसरे मुख्यमंत्री असतील. माजी मुख्यमंत्री मा.सा. कन्नमवार यांचे मारोडा या गावाशी घट्ट नाते होते. तशीच घट्ट नात्याची विण मूल या गावाशी नव्या मुख्यमंत्र्यांची आहे. मूलशी केवळ त्यांचे कौटुंबिक नातेच नाही तर, या शहरात त्यांनी आपले बालपण घालविले आहे. म्हणूनच त्यांची मुख्यमंत्रिपदी निवड होणार हे कळल्यापासून या शहराला आनंदाचे भरते आले आहे. कौतुकासोबतच त्यांच्याकडून अपेक्षाही वाढल्या आहेत. अमृतराव फडणवीस हे देवेंद्र फडणवीस यांचे पणजोबा ! ते मालगुजार होते. सन १९२७ ला त्यांनी मूल येथे ‘वाडा’ बांधला त्याला ‘फडणवीस वाडा’ म्हणून ओळखले जाते. याच वाड्यात आजोबा काशिराव फडणवीस यांची आठ अपत्ये बागडली. नरहरी फडणवीस, माधवराव फडणवीस, गंगाधर फडणविस, बाळासाहेब फडणवीस, बाबा फडणवीस तर बहिणी सुशीला, विमल, प्रेमिला अशी ही भावंड. माधवराव फडणवीस हे आमदार शोभाताई फडणवीस यांचे पती होते. युतीच्या काळात त्या कॅबिनेट मंत्री होत्या. सध्या त्या विधानपरिषदेच्या सदस्या आहेत. भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस हे सुद्धा विधानपरिषदेचे सदस्य होते. देवेंद्र यांचे बालपण मूल येथे गेले. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मूलमध्येच झाल्याचे त्यांचे बालमित्र सांगतात. पुढे शिक्षणासाठी सन १९६५ दरम्यान ते नागपूरला स्थायिक झाले. बालपणापासून वाड्यात होणाऱ्या जनसंघाच्या बैठकांमधून त्यांना राजकारणाचे बाळकडू मिळाले. नागपूरला स्थायिक झाल्यावरही त्यांचा मूलशी कायम संपर्क राहिला. नागपूरचे महापौर असताना आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असतानाही त्यांची मूलची वारी कधी चुकली नाही. आता मुख्यमंत्री झाल्यावर ते कधी येतात, याकडे मूलवासीयांचे लक्ष लागले आहे.कौतूक अन् अपेक्षांची बरसात !महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस आरुढ होत असल्याने मूलवासीयांमध्ये आनंद पसरला आहे. त्यांच्या कुटुंबाशी जुळून असलेले अनेकजण त्यांना शुभेच्छा देत आहेतच, सोबतच तालुक्यातून नव्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षाही वाढल्या आहेत. येथील व्यावसायिक मोती टहलियानी म्हणाले, गावाशी नाळ जुळली असणारे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आरुढ होत असल्याने अत्यानंद होत आहे. मूल येथे त्यांची आजही शेती आहे. ते शेतकरी कुटुंबातील आहे. त्यांना येथील भात उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा माहीत आहेत. या भागात शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था ते उभारतील, असा विश्वास आहे. राजोलीतील भाजपाचे ८१ वर्षीय वयोवृद्ध कार्यकर्ते शामराव पेशेट्टीवार म्हणाले, जनसंघापासून देवेंद्र भाजपाशी जुळले आहेत. आपल्या भागातील मुख्यमंत्री होत असल्याने तालुक्यातील समस्या विशेष प्राधान्याने सोडवतील अशी त्यांना अपेक्षा आहे.राजोलीतील भाजपाचे कार्यकर्ते असलेले ८३ वर्षीय आनंदराव शेंडे यांनीही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत असल्याने तालुक्याच्या विकासाला मोठा आधार मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.देवेंद्र फडणवीस यांचे बालमित्र रवींद्र बोकारे म्हणाले, देवेंद्रला क्रिकेटचे जास्त आकर्षण आहे. मूलमध्ये आल्यावर सर्व मित्र जमून आम्ही वाड्यात क्रिकेट खेळत असू. या मातीशी देवेंद्रची नाळ जुळली असल्याने या भागाचा विकास होईल. मूल पंचायत समितीचे उपसभापती गजानन वल्केवार म्हणाले, ग्रामीण भागाचा आत्मा असलेल्या पंचायत समितीत नव्या मुख्यमंत्र्यांच्या पायगुणाने विविध योजनांची अमंलबजावणी समक्षपणे होईल असा विश्वास आहे.मूल भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष अविनाश जगताप म्हणाले, युवा मुख्यमंत्री मिळाल्याने युवकांच्या समस्या सोडविण्यास मदत होईल. विशेषत: तालुक्यातील बेरोजगारांना न्याय देण्याचा प्रयत्न ते नक्कीच करतील. मारोडा येथील प्रवीण तोटावार यांनीही बेरोजगारीचा प्रश्न नवे मुख्यमंत्री सोडवितील, अशी अपेक्षा व्यक्त केली. मूल शहरात लहानपणापासून वाढलेले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदी आरुढ होत आहेत. आमच्या शहराबद्दल आम्हाला अभिमान आहे. मूल शहर, सुंदर शहर अशी संकल्पना राबवून ते विकासाला हातभार लावतील, अशी अपेक्षा संजय चिंतावार यांनी व्यक्त केली आहे.