शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
3
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
4
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
5
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
6
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
7
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
8
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
9
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
10
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
11
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
12
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
13
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
14
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
15
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
16
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
17
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
18
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
19
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
20
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण

डोंगरगावात वडिलांविरूद्ध मुलगा रिंगणात

By admin | Updated: July 30, 2015 01:05 IST

नागभीड तालुक्यातील ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीचे रणकंदन सुरू आहे. सारेच मोहरे इरेला पेटले आहेत.

नागभीड : नागभीड तालुक्यातील ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीचे रणकंदन सुरू आहे. सारेच मोहरे इरेला पेटले आहेत. नाती गोती दुय्यम ठरली असून डोंगरगाव येथे चक्क वडील आणि मुलगा एकमेकांविरूद्ध उभे ठाकले आहेत.इतर कोणत्याही बाबतीत नाही पण निवडणूक म्हटले की लोकांना एक वेगळेच स्फुरण चढते. डोंगरगाव मध्येही आजवर तेच होत आले. या गावाचा तसा पिंडच राजकीय आहे. २० वर्ष नागभीड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि २० वर्ष डोंगरगावचे सरपंच राहिलेल्या स्व. वासुदेवराव पाथोडे यांनी या गावाची जिल्ह्याच्या राजकारणात एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. तेच डोंगरगाव आता वडील आणि मुलामध्ये होत असलेल्या लढाईने पुन्हा चर्चेत आले आहे.राजेश्वर सोनबा शिवणकर या व्यक्तीची गावाचा मेंबर व्हावा ही ईच्छा होती. तसे त्याने प्रयत्न चालवले. गावातील एका प्रमुख पॅनलने त्याची दखल घेतली आणि त्यांना पॅनलमध्ये सामावून घेतले. तोपर्यंत राजेश्वरचा मुलगा गुरूदेव यानेही आपला प्रचार सुरू केला होता. त्याची धडक लक्षात घेवून दुसऱ्या प्रमुख पॅनलने त्याला आपल्या पॅनलमध्ये घेतले. दोघांनीही वेगवेगळ्या पॅनलकडून नामांकन दाखल केले. नंतर एकमेकांना समजविण्याचे खुप प्रयत्न झाले पण सारेच व्यर्थ. दोघेही आपआपल्या भुमिकेवर ठाम राहिले. आता दोघांचाही प्रचार जोमात सुरू आहे. मतदार कोणाला कौल देतात, याकडे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)