शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
6
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
7
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
8
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
9
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
10
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
11
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
12
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
13
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
14
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
15
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
16
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
17
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
18
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
19
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
20
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी

घरकूल यादीचा घोळ निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 06:00 IST

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी (ग्रामीण) घरकूल यादी बनविताना प्रशासकीय पातळीवर झालेली चूक तालुक्यातील घरकूल लाभार्थ्यांना चांगलीच भोवली होती. एका गावातील नावे दुसऱ्या गावात गेल्याने २३२ लाभार्थ्यांना घरकुलापासून वंचित राहावे लागले होते. हा प्रकार तालुक्यातील १२ गावांमध्ये घडला होता. ऑगष्ट २०१६ रोजी प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरकूल लाभार्थ्यांची निवड यादी बनविण्यात आली.

ठळक मुद्दे२३२ लाभार्थ्यांना दिलासा : लाभार्थ्यांची नावे मूळ गावात समाविष्ट

घनश्याम नवघडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : ऑगष्ट २०१६ रोजी घरकूल यादीमध्ये प्रशासकीय पातळीवर झालेली घोडचूक अखेर दुरूस्ती करण्यात आली. त्यामुळे तालुक्याच्या १२ गावांतील २३२ लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, नागरिकांवर अन्याय होऊ नये, यासाठी ‘लोकमत’ ने हा प्रश्न सातत्याने लावून धरला होता.प्रधानमंत्री आवास योजनेसाठी (ग्रामीण) घरकूल यादी बनविताना प्रशासकीय पातळीवर झालेली चूक तालुक्यातील घरकूल लाभार्थ्यांना चांगलीच भोवली होती. एका गावातील नावे दुसऱ्या गावात गेल्याने २३२ लाभार्थ्यांना घरकुलापासून वंचित राहावे लागले होते. हा प्रकार तालुक्यातील १२ गावांमध्ये घडला होता. ऑगष्ट २०१६ रोजी प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरकूल लाभार्थ्यांची निवड यादी बनविण्यात आली. मंजुरीसाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे पाठविण्यात आली. मात्र यादी बनविताना प्रशासनाने काळजी न घेतली नाही. त्यामुळे १२ गावातील २३२ लाभार्थ्यांना ही चुक भोवली. यादी दुरूस्त करण्यासाठी लाभार्थ्यांची पायपीट सुरू होती. अखेर ‘लोकमत’ च्या पाठपुराव्यामुळे गुरूवारपर्यंत जिल्ह्यातील ३८ गावांपैकी १९ गावातील हा प्रश्न निकाली निघाला होता. येत्या चार पाच दिवसात सर्वच गावांची समस्या दूर होणार आहे.प्रशासन झाले जागेप्रशासनाकडून घरकूल यादीत घोळ निर्माण केल्याने पात्र नागरिकांवर अन्याय झाला होता. लोकमतने सुरूवातीपासून हा प्रश्न लावून धरल्याने प्रशासन जागे झाले. त्यामुळे चुकी दुरूस्ती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.पात्र कुटुंब घरकूलपासून वंचितशंकरपूर : खैरी येथील संजय शंकर नांदेकर यांचे नाव प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरकूल योजनेच्या शासनाच्या प्रपत्र ब मध्ये आहे. परंतु पंचायत समितीच्या चुकीने घरकूलपासून वंचित राहावे लागत आहे. संजय नांदेकर हे अनेक वर्षांपासून घरकूलसाठी पंचायत समितीचे उंबरठे झिजवित आहेत. नांदेकर यांचे नाव प्रधानमंत्री आवास योजनेत सन २०१६ च्या पात्र यादीत आले होते. मात्र, घरकूलचा लाभ मिळाला नाही. सदर व्यक्तीचे नाव चुकीने वगळण्यात आले. नाव यादीत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सहाय्यक अभियंता सुशील गंत्रटवार यांनी दिली.लाभार्थ्यांची नावे मूळ गावांच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी संंबंधित गावाच्या ग्रामसभेचा ठराव मागण्यात आला होता. राष्ट्रीय माहिती केंद्राच्या सहकार्याने आतापर्यंत १९ गावांचा प्रश्न निकाली काढण्यात आला आहे. तीन-चार दिवसात उर्वरित गावांचाही प्रश्न लवकरच सुटणार आहे.- प्रणव बक्षी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, जि. ग्रा.वि.यंत्रणा चंद्रपूरपात्र कुटुंबांवर अन्याय होऊ नये, यासाठी 'लोकमत' ने हा प्रश्न सातत्याने उचलून धरला. जि. प. मध्ये मी यावर चर्चा घडवून आणली. ही समस्या आता दूर होणार असल्याने याचा आनंद आहे.- संजय गजपुरे, जि.प.सदस्य पारडी-मिंडाळा.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना