शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

ंडिमांड भरूनही सौर पंप मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:41 IST

शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा व्हावी, वीज जोडणीसाठी आर्थिक भूर्दंड बसू नये तसेच वीज वितरण कंपनीवर येणारा ताण लक्षात घेता राज्यशासनाने सौर कृषीपंप योजना सुरू केली. या योजनेला शेतकऱ्यांनीही मोठा प्रतिसाद दिला.

ठळक मुद्दे६४ शेतकऱ्यांनी केली मागणी: सौर पंप, वीजही नसल्याने शेतकरी सिंचनापासून वंचित

राजू गेडाम ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा व्हावी, वीज जोडणीसाठी आर्थिक भूर्दंड बसू नये तसेच वीज वितरण कंपनीवर येणारा ताण लक्षात घेता राज्यशासनाने सौर कृषीपंप योजना सुरू केली. या योजनेला शेतकऱ्यांनीही मोठा प्रतिसाद दिला. मात्र तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी अर्ज तसेच डिमांड भरूनही सौर कृषीसंचच दिल्या जात नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, महावितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी समाधानकारक उत्तर देत नसल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.या योजनेनुसार कृषी पंपासोबत दोन एलईडी बल्ब, एक डिसी पंखा, व एक मोबाईल चार्जिग सॉकेट देण्याचा निर्णय शासनाने घेतला. शेतकऱ्यांनी सिंचनाची सुविधा होईल, या आशेने मोठ्या प्रमाणात अर्ज सादर केले. काहींना डिमांड भरण्याचे पत्र आले. त्यानंतर डिमांडही भरण्यात आली. प्रथम बोअरवेलसाठी शेतकऱ्यांनी पैसा खर्च केला. त्यानंतर डिमांड भरली. आतातरी सौर पंप शेतात लागेल आणि सिंचनाची सुविधा होईल, अशी शेतकऱ्यांची आशा होती. मात्र ती फोल ठरली आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी वीज कंपनीच्या कार्यालयात विचारणा केली असता समाधानकारक उत्तरे दिल्या जात नसल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे. त्यामुळे आता न्याय कुणाला मागायचा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.शेतात लाखो रुपये खर्च करून बोअरिंग लावली. मुख्यमंत्री सौर पंप योजनेंतर्ग डिमांडच्या माध्यमातून रक्कम भरली. शेतीच्या हंगामात सौर पंप कामात येऊन सिंचनाची व्यवस्था होईल, असे वाटले. मात्र हंगामात सौर पंप मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. वीज कंपनीकडुन उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. तॅ-संतोष सोनवणे,शेतकरी चक्क कोंसबीमुख्यमंत्री सौर पंप योजनेसाठी मुल तालुक्यातील ६४ शेतकऱ्यांनी अर्ज भरले. त्यापैकी १७ जणांनी डिमांड भरले आहेत. सौर पंपासाठी तीन कंपण्याची निवड करण्यात आली आहे. डिमांड भरल्यानंतर मोबाईलवर काही दिवसांनी मॅसेज येतो. त्यानंतर कंपनीची निवड करायची आहे. निवड केल्यानंतर कंपनी शेतकऱ्यांच्या शेतात पहाणी करून सौर पंप लावून देते. यासंदर्भात काही अडचण आल्यास कार्यालयात मार्गदर्शन करण्यात येईल.- चंदनसिंह चौरसिया,उपकार्यकारी अभियंता म.रा.वि.कंपनी मूल