शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सौरऊर्जा पंप भागवितात तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:01 IST

कोट्यवधी रूपये खर्चून नजरेला भिडणाऱ्या गगनचुंबी इमारती आणि भव्य योजनांच्या उभारणीतच ‘विकास’ दडला, या अभिनिवेशात काही लोकप्रतिनिधी धन्यता मान्यतात. मात्र, निसर्गानुकूल व संतुलित योजनांची अंमलबजावणी करताना आढेवेढे घेतात.

ठळक मुद्देवीजभाराचा खर्च शून्यावर : जिल्ह्यातील ३०८ गावांना शाश्वत पाणी पुरवठा

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोट्यवधी रूपये खर्चून नजरेला भिडणाऱ्या गगनचुंबी इमारती आणि भव्य योजनांच्या उभारणीतच ‘विकास’ दडला, या अभिनिवेशात काही लोकप्रतिनिधी धन्यता मान्यतात. मात्र, निसर्गानुकूल व संतुलित योजनांची अंमलबजावणी करताना आढेवेढे घेतात. २००९-१० मध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमअंतर्गत जिल्ह्यात ३०८ सौर दुहेरी पंप लघुनळ पाणी पुरवठा योजना सुरू झाली होती. यातील बहुतेक पंप सुरळीत असून वीज भाराचा खर्चही निरंक आहे. भीषण टंचाईच्या काळात तहान भागविणारे हे सौरऊर्जा पंप शेकडो कुटुंबांना शाश्वत पुरवठा करीत आहे. त्यामुळे अशा पंपांची संख्या का वाढवू नये, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी मुबलक पाणी पुरवठा योजना व वीजेची समस्या आहे. त्यामुळे नागरिकांना विजेवर आधारित पंपाद्वारे पिण्याच्या पाण्याची गरज भागविताना अडचणींचा सामना करावा लागतो. जिवती, कोरपना, राजुरा या तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये दरवर्षी पाणी टंचाईने नागरिकांचे हाल होतात. राज्य शासनाच्या विविध योजनांमधून मोठ्या गावांमध्ये पाणी पुरवठा योजना सुरू झाली. बºयाच ग्रामपंचायतींनी स्वत:च्या उत्पन्नातील महत्त्वाचा वाटा या योजनेसाठी खर्ची घालत आहेत. मात्र दीर्घकालीन योजनेचा अभाव व वर्षभर विजेची समस्या असणाºया गावांमध्ये पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत २००९-१० पासून जिल्हा परिषदच्या यांत्रिकी उपविभागाच्या अखत्यारित सौर दुहेरी पंप लघुनळ पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली. जिल्ह्यात ३०८ सौर दुहेरी पंप सुरू आहेत. यासाठी ५ लाखांची मर्यादा आहे. सौरउर्जा पंपांची देखरेख करण्याची जबाबदारी जि.प. यांत्रिकी उपविभागाकडे देण्यात आली. आर्थिक खर्चाविना ग्रामस्थांना पिण्याचे मुबलक पाणी मिळत असल्याने योजनेची व्याप्ती वाढवावी, अशी अपेक्षा लाभार्थी गावातील सरपंचांनी व्यक्त केली आहे.अशी होते पाणी साठवणसौर ऊर्जा योजनेमध्ये विंधन विहिरींवर हात पंपासोबत सौर पंपाची उभारणी केली जाते. सौर ऊर्जा पंपाचा उपसर्ग साठवण टाकीत साठविल्यानंतर पाईप लाईनद्वारे घरोघरी पाणीपुरवठा केला जातो. हातपंप व सौर पंपाची उभारणी स्वतंत्ररीत्या विंधन विहिरीत करण्यात आली आहे. त्यामुळे हातपंप बिघडल्यास झाल्यास सौरपंप किंवा सौरपंप नादुरूस्त झाल्यास हातपंपाद्वारे नियमितपणे पाणी पुरवठा सुरू राहतो. हा पंप सौरऊर्जेवर चालत असल्याने विद्युतभाराचा खर्च शून्यावर आला आहे. ग्रामस्थांनी या पंपाची काळजीपूर्वक हाताळणी केल्यास जलसंकट दूर होईल.