शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

चांदा ते बांदा योजनेतून ‘सोलर चरखा क्लस्टर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 23:04 IST

चांदा ते बांदा योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील चार तालुक्यात सोलर चरखा क्लस्टर करण्यात येत असल्याची माहिती वनमंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार यांची माहिती : जिल्ह्यातील चार तालुक्यांची निवड

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चांदा ते बांदा योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील चार तालुक्यात सोलर चरखा क्लस्टर करण्यात येत असल्याची माहिती वनमंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, पोंभुर्णा, गोंडपिंपरी आणि राजुरा तालुक्यामध्ये हे सोलर चरखा क्लस्टर करण्यात येत असल्याचे सांगून ना. मुनगंटीवार म्हणाले, या नावीन्यपूर्ण कामास राज्यस्तरीय समितीने ८ जानेवारी २०१९ रोजीच्या बैठकीत मान्यता दिली होती.त्यानुसार आता या कामासाठी ८१३ लाख एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासंबंधीचे प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना विशेष बाब म्हणून देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.केंद्र आणि राज्य शासन महात्मा गांधीजी यांची १५० वी जयंती साजरी करीत आहे. या पार्श्वभूमीवर सोलर चरखा क्लस्टरच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देताना खादीला प्रोत्साहन देण्याचे धोरणही शासनाने स्वीकारले आहे. भारतीय स्वातंत्र्य लढयाचे आणि स्वदेशी चळवळीचे प्रतिक म्हणून चरख्याकडे पाहिले जाते. जिल्ह्यात मोठया प्रमाणात कापूस पिकाखालील क्षेत्र आहे. परंतु कापसापासून तयार होणाऱ्या गाठी, पुढील प्रक्रिया करणारे उद्योग या भागात नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या नगदी पिकाला योग्य भाव मिळत नाही.हेच लक्षात घेऊन चांदा ते बांदा या पथदर्शी विकास योजनेतून खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मदतीने कापूस ते कापड प्रकल्प सुरु करण्याचा, कापसाचे मूल्यवर्धन करून या पिकाला चांगला भाव देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.यातून स्थानिक भागातील महिलांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांचे सक्षमीकरण होण्यास देखील मदत होणार आहे.खादीचे उत्पादन वाढविण्यावर भरप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खादीचा पुरस्कार केला आहे. आता तरूणांमध्येही खादी लोकप्रिय होत आहे. मोठमोठया वस्त्रोद्योग कंपन्या खादी गारमेंट उत्पादनात उतरत आहेत. या पार्श्वभूमीवर चरख्यांच्या माध्यमातून खादीचे उत्पादन वाढवण्याचा हा प्रयत्न आहे. पारंपरिक अंबर चरख्यावर होणारी सुतकताई, त्यासाठी महिलांना घ्यावे लागणारे परिश्रम, मिळणारे अत्यल्प उत्पन्न, उत्पादन आणि सुताचा दर्जा यामध्ये अमुलाग्र सुधारणा सोलर चरख्यांच्या माध्यमातून करणे शक्य झाले आहे. त्यामुळेच शासनाच्या खादी व ग्रामोद्योग मंडळाकडून मोठया प्रमाणात सोलर चरख्याचा पुरस्कार केला जात असल्याची माहितीही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.