शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मूलमध्ये सामाजिक कार्यकर्ते व गुणवंतांचा सत्कार

By admin | Updated: September 2, 2015 00:50 IST

जगात ज्ञानाला तोड नसून ज्ञान हे संपन्न देशाची संपत्ती मानली जाते. यासाठी बुद्धिमान विद्यार्थी घडणे देशासाठी आवश्यक आहे.

सुधीर मुनगंटीवार : ज्ञान हे संपन्न देशाचे द्योतक मूल : जगात ज्ञानाला तोड नसून ज्ञान हे संपन्न देशाची संपत्ती मानली जाते. यासाठी बुद्धिमान विद्यार्थी घडणे देशासाठी आवश्यक आहे. बुद्धीमत्ता आपल्या देशात वास करीत असून आजही इतर देशात भारताचे नाव घेतले जाते. स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर बुद्धिमान घडणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्ञान हे संपन्न देशाचे द्योतक आहे, असे मत राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. मूल येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळ्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. मूल तालुका पत्रकार संघाच्या वतीने रामलिला भवन मूल येथे आयोजित दहावी व बारावीतील प्राविण्य प्राप्त विद्यार्थी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेवजाबाई हितकारणी महाविद्यालय ब्रह्मपुरीचे प्राचार्य डॉ.एन.एम. कोकोडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र गीते, तहसीलदार राजेश सरवदे, पंचायत समिती सदस्य संजय मारकवार, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पडोळे आदी मंचावर उपस्थित होते.प्रास्ताविकातून पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पडोळे यांनी मूल शहरातील मुख्य समस्या ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या समोर मांडल्या. यावेळी सामाजिक कार्यासाठी डॉ.रामचंद्र दांडेकर, क्रीडा क्षेत्रासाठी मिथुन महाडोरे, वाहतूक शिपाई नरेंद्र अंडेलवार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चितेगावच्या पदविधर शिक्षिका जयश्री दिक्षीत तसेच दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा ना. सुधीर मुनगंटीवारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन विनायक रेकलवार यांनी केले. प्रास्ताविक संजय पडोळे तर आभार गुरू गुरुनुले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार संघाचे रामकृष्ण नखाते, रमेश माहुरपवार, राजू गेडाम, दीपक देशपांडे, भोजराज गोवर्धन, गंगाधर कुनघाडकर, वासुदेव आगडे, युवराज चावरे आदिंनी परिश्रम घेतले. यावेळी शहरातील अनेक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)अध्यक्षस्थानावरुन प्राचार्य डॉ. कोकाडे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना उद्देशून जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर नियोजन महत्त्वाचे असते. नियोजनबद्ध आखणी केली व मनात जिद्द, आत्मविश्वास असला तर जीवनात नक्कीच यश मिळते हे आपल्या स्वत:च्या उदाहरणातून विद्यार्थ्यांना पटवून दिले. भारत २०२० पर्यंत महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत आहे. ते केवळ बुद्धिमत्तेच्या बळावरच, त्यामुळे प्रत्येकानी उच्चशिक्षित व्हावे असे प्राचार्य कोकाडे म्हणाले.