शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

वाढीव वीजबिलाविरोधात सामाजिक संघटना एकवटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 05:00 IST

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने सुरु केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिक, मजूर, किरकोड व्यापारी यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे वीज वितरण विभागाने पाठविलेले वारेमाप बिल भरणे जनसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे वीज बिल माफ करण्याची मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री, उर्जामंत्री यांना पाठवलेल्या निवेदनातून नगरसेविका कल्पना इंदुरकर यांनी केली.

ठळक मुद्देवीज बिल माफ करा : ठिकठिकाणी दिलेल्या निवेदनातून सामाजिक संघटनेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लॉकडाऊन कालावधीतील तीन महिन्यांचे विद्युत बिल माफ करावे, अशी मागणी विविध सामाजिक संघटनेकडून करण्यात येत आहे. अनेक सामाजिक संघटनांनी याबाबतचे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे.धर्मनिरपेक्ष लोकशाही आघाडीचंद्रपूर : महावितरण कंपनीने वितरीत केलेले लॉकडाऊन कालावधीतील तीन महिन्यांचे एकत्रित वीजबिल भरणे जनसामान्यांना अडचणींचे जात आहे. त्यामुळे वीज बिल माफ करण्याची मागणी धर्मनिरपेक्ष लोकशाही संघटनेतर्फे बाबुपेठ येथील मुख्य अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.यावेळी प्रा. नामदेव कन्नाके, वामन बुटले, मंगेश बदखल, अंकुश वाघमारे, इंदुताई डोंगरे, वर्षा लाटेकर, सुविधा बांबुळे, याकुब पुल्ला, कोमुरय्या चीराप आदी उपस्थित होते.गोंडपिपरीत भाजपचे निवेदनआक्सापूर : लॉकडाऊनमुळे जनसामान्यांना येत असलेल्या अडचणीमुळे थकित वीज बिल माफ करावे, तसेच पुनर्गगठन केलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करावे अशी मागणी भारतीय जनता पाटीतर्फे करण्यात आली. यावेळी तालुका अध्यक्ष बबन निकोडे, माजी नगराध्यक्ष संजय झाडे, निलेश संगमवार उपस्थित होते.चिमुरात उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनचिमूर : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने सुरु केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिक, मजूर, किरकोड व्यापारी यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे वीज वितरण विभागाने पाठविलेले वारेमाप बिल भरणे जनसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे वीज बिल माफ करण्याची मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री, उर्जामंत्री यांना पाठवलेल्या निवेदनातून नगरसेविका कल्पना इंदुरकर यांनी केली. याप्रंसगी अनिता बोरकर, बिल्कीस शेख, वनिता सहारे, वनमाला सहारे, शोभा भगत आदी उपस्थित होते.अभियंत्याला निवेदनघुग्घुस : लॉकडाऊनमुळे अनेक छोटे-मोठे उद्योग, व्यापार व रोजगार बुडाला. परिणामी आर्थिक अडचणीमुळे बिल भरणे शक्य नसल्याने वीज बिल माफ करावे, अशी मागणी येथील सहायक अभियंत्यांना म. रा. सु. रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेना व शिवसेना महिला आघाडीच्या वतीने दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष किशोर बोबडे, तालुका प्रमुख सुमेश रंगारी, शहर प्रमुख परिवर्तन कुम्मरवार, सहसचिव विठ्ठल अतकरे, हिरालाल शहा, शिवसेना महिला आघाडी संगीता बोबडे, नीता मुक्के, नीता श्रीवास्त, उज्वला मडावी, आशा काळे, शिला धोबे आदी उपस्थित होते.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज