शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आतापर्यंत ५० हजार १६ जणांनी घेतला प्रतिबंधात्मक डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:29 IST

कोरोना प्रतिबंधासाठी ६० वर्षे तसेच ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त व्यक्तींना लस घेताना अडचणी येऊ नये, याकरिता सर्व उपजिल्हा ीुरुग्णालय, ग्रामीण ...

कोरोना प्रतिबंधासाठी ६० वर्षे तसेच ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त व्यक्तींना लस घेताना अडचणी येऊ नये, याकरिता सर्व उपजिल्हा ीुरुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व १८ प्राथमिक आरोग्य केंद्रांतही कक्ष सुरू झाले होते. दुसऱ्या टप्प्यात केंद्रांची संख्या पुन्हा वाढविण्यात आली. जिल्ह्यात सद्यस्थितीत ६८ केंद्रांवर प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे. प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी प्रत्येक केंद्राला उद्दिष्ट देण्यात आले. त्यानुसार सायंकाळी ५ वाजेपर्यंत दररोजची उद्दिष्ट्यपूर्ती होत आहे. जिल्हा प्रशासनाने राज्याच्या आरोग्य विभागाकडे लसींची मागणी नोंदविल्यानंतर शुक्रवारी लसींचे ४९ हजार ८०० डोस मिळाले. त्यातील केवळ कोविडशिल्डचे डोस जिल्ह्यातील सर्व केंद्रांना पाठविण्यात आले.

‘कोव्हॅक्सिन’ लस अद्याप वितरणाविना

पहिल्या टप्प्यात लसीकरणासाठी सीरम इन्स्टिट्यूटची ‘कोव्हिशिल्ड’ लस पाठविण्यात आली. दुसऱ्या टप्प्यातील मागणीनुसार, राज्य सरकारने भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ लसीचे ४ हजार ८०० डोस पहिल्यांदाच पाठविले. ही लस अत्यंत कमी तापमानात साठवून ठेवावी लागते. त्यामुळे स्वतंत्र केंद्रासह अन्य सुविधा पूर्ण झाल्यानंतरच ही लस वितरण केली जाणार आहे.

९ हजार ८९२ जणांचा दुसरा डोस पूर्ण

जिल्ह्यातील ९ हजार ८९२ हेल्थ केअर आणि फ्रन्टलाईन वर्करनी कोरोना लसीचा दुसरा डोस पूर्ण केला. सोमवारी १० हजार १९४ फ्रन्टलाईन वर्करनी पहिली डोस घेतली.

वेकोलिच्या तीन रुग्णालयातही प्रारंभ

यापूर्वी वेकोलिच्या रुग्णालयात लस देण्यास मंजुरी मिळाली नव्हती. मात्र सोमवारपासून माजरी, घुग्घुस व सास्ती येथील वेकोलिच्या रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात झाली आहे. याशिवाय गडचांदूर ग्रामीण रुग्णालय व जिवती तालुक्यात पाटणा आरोग्य केंद्रात डोस देणे सुरू झाले.

बाबूपेठ व इंदिरानगरातही केंद्र

चंद्रपूर मनपा आरोग्य विभागाकडून चार केंद्रांमध्ये लस दिली जात होती. त्यामध्ये पुन्हा बाबूपेठ व इंदिरानगरात दोन केंद्रांची भर पडली. लक्ष्मीनारायण मंदिराजवळ व वडगाव येथेही केंद्र सुरू होणार आहे.