शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खैरे कुणबी समाजाचे स्नेहमीलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 22:11 IST

स्नेहमीलन सारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज बांधव एकत्रित येवून आपले ऋणानुबंध दृढ करीत असतात. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे.

ठळक मुद्देविजय देवतळे : आपुलकीच्या नात्यामधून परस्परांत स्नेह जपावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्नेहमीलन सारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज बांधव एकत्रित येवून आपले ऋणानुबंध दृढ करीत असतात. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आपले संबंध कायम टिकवण्यासाठी समाज बांधवांनी आपुलकीच्या नात्यामधून परस्परामध्ये स्नेह जपावा, असे प्रतिपादन खैरे कुणबी समाजाचे जिल्हाध्यक्ष डॉ. विजय देवतळे यांनी केले.खैरे कुणबी समाज स्नेह व सांस्कृतिक मंडळ चंद्रपूरच्या वतीने स्थानिक पंचवटी लॉन येथे आयोजित स्नेहमिलन सोहळ्याचे उद्घाटन म्हणून ते बोलत होते. त्यांनी यासारख्या कार्यक्रमामधून समाजबांधवांनी आपल्या अंगी असलेले सुप्त गुण, विविध कलांचे सादरीकरण करण्याची संधी मिळत असल्याचे सांगितले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य डॉ.आसावरी देवतळे होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून सहसचिव दिनकर ठोंबरे, एम.के. ट्रेडर्सचे मनोज कळसकर, समाजाचे सचिव जे.डी. पोटे, प्रा.सुधाकर पांडव, जयंत लांडगे, आनंद कुडे, गणपत कुडे, पुनाबाई चिमूरकर, सुमन चाफले, गीता कुडे, विजय धंदरे, प्रा.निलेश ढेकरे, अ‍ॅड. राकेश अवघडे, नरेंद्र पेटकर, घनश्याम गोहणे, अमरदीप खोडके, बालाजी पाल, शैलजा कळसकर, विलास खडसे, श्यामराव धानोरकर आदींची उपस्थिती होती.यावेळी डॉ.आसावरी देवतळे यांनी आपण कितीही मोठे झालो तरी समाज ऋण विसरू नये, असा सल्ला दिला. याप्रसंगी शैलजा कळसकर, निरंजना पोटे, मंजुषा डंभारे, अरुण भोयर, विठ्ठल धोटे, विजय चिताडे, प्रशालिनी पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धा पार पडल्या. प्रास्ताविक जे.डी. पोटे यांनी तर संचालन अरुण भोयर, शैलजा कळसकर यांनी केले. आभार किरण नागापूरे यांनी मानले. यावेळी समाज बांधवांची मोठी उपस्थित होती.