शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणातून राजुरा परिसरात दारुची तस्करी

By admin | Updated: February 2, 2017 00:36 IST

तेलंगाना राज्य सीमेलगत लक्कडकोट गाव लागून असल्याने या गावातील काही युवकांनी दारु तस्करीत उडी घेतली आहे.

पोलिसांचे दुर्लक्ष : लक्कडकोट ठरले दारुविक्रेत्यांचे झोन राजुरा : तेलंगाना राज्य सीमेलगत लक्कडकोट गाव लागून असल्याने या गावातील काही युवकांनी दारु तस्करीत उडी घेतली आहे. गर्भश्रीमंत होण्याचा हा ‘शॉर्टकट’ मार्ग असल्याने त्यांनी या अवैध मार्गाला रोजगाराचा पर्याय दिला आहे. त्यामुळे तेलंगाना राज्यातील भन्नाटा व वाकडीमधून दारु तस्करीला उधाण आले आहे.या तस्करांमुळे शहरासह धोपटाळा वेकोलि क्षेत्र, देवाडा, सास्ती, आर्वी, चुनाळा या गावात दारुचा पाट वाहत आहे. पोलिसांसोबतच्या मधूर संबंधामुळे त्या तस्कराची दबंगगिरी दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे या तस्कराला जेरबंद करण्याचे मोठे आवाहन दारुबंदी पथकापुढे तस्कराची हिंमत वाढली असून त्यांनी दिवसाढवळ्या खुलेआम दारु तस्करी सुरू केली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात दारु तस्करी होत असतानासुद्धा हा गोरखधंदा पोलिसात दिसत नसल्याबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.जिल्ह्यात दारुबंदी होताच दारु तस्करी रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. जिल्ह्याला लागून असलेल्या इतर जिल्हा व आंतरराष्ट्रीय सीमेवर पोलिसांची तैनाती करण्यात आली आहे.विशेष पथकाच्या माध्यमातून तस्करांवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. पण पथक व तैनातीमधील काही ‘भेदी’ पोलिसामुळे निर्ढावलेले तस्करच पोलिसांवर भारी पडत असल्यााचे पहायला मिळत आहे. त्यामुळे इमानदार पोलिसांची मोठी पंचाईत होत आहे. येथील ठाणेदार इंगळे यांनीसुद्धा दारुविक्रेत्यांना सक्त ताकीद दिली आहे. तस्करांवर कारवाईचे सक्त संकेत दिले आहे. पण याच विभागातील काही खादाड पोलिसामुळे दारु तस्करी जोमात सुरू आहे.मागील आठवड्यात आर्वी जंगलालगत दारुची गाडी पकडल्याची चर्चा आहे. पण चिरीमिरी घेऊन त्याला सोडून देण्यात आल्याचे समजते. हा तस्कर लक्कडकोटचा असल्याची माहिती पुढे आली आहे. लक्कडकोटच्या ‘त्या’ दारु तस्कराकडे तीन गाड्या असून याच गाड्यामधून मोठ्या प्रमाणात दारु पेट्याची तस्करी होत आहे. सोंडो, सुकमडपल्ली, भुरकुंडा, खामोना, आर्वीॅ या आडमार्गाने दारुची तस्करी सुरू आहे. मागणीनुसार खेडेगावातील दारु विक्रेत्यांना दारुपुरवठा करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)