शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यातील घाटांवर रेती तस्करी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:32 IST

तालुक्यातील बहुतांश रेतीघाटांवर पोकलॅन्डचा अवैध वापर करून मोठ्या प्रमाणात रेतीचे खनन सुरू आहे. याविरुद्ध नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या. मात्र, तालुका प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने कोट्यवधींचा महसूल बुडत आहे.

ठळक मुद्देलाखोंचा महसूल बुडाला : तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : तालुक्यातील बहुतांश रेतीघाटांवर पोकलॅन्डचा अवैध वापर करून मोठ्या प्रमाणात रेतीचे खनन सुरू आहे. याविरुद्ध नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या. मात्र, तालुका प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने कोट्यवधींचा महसूल बुडत आहे.तालुक्यातील रेती उत्तम दर्जाची दजार्ची असल्यामुळे बहुतांश कंत्राटदार रेती घाटांची लिलावात खरेदी करून जिल्ह्याबाहेर वाहतूक करीत आहेत. चिचाळा, हळदी, उश्राळा, भेजगांव, सुशी (दाबगाव) विरई, चितेगाव, राजोली, अंतरगाव पारडवाही येथील रेती घाटांचा लिलाव झाला आहे. तर काही घाटांचे अजुनपर्यंत लिलाव झाले नाही. परंतु यातील काही घाटांमधून दररोज लाखो रूपयांच्या रेतीचे अवैध खनन करून हायवा ट्रकद्वारे मूल शहरातून चंद्रपूर व इतर तालुक्यांत वाहतुक केली जात आहे. उपविभागीय अधिकारी, तहसील कार्यालयासमोरून हे ट्रक दिवसाढवळ्या जात असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे. तालुका व जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये मोठया प्रमाणावर घरांचे बांधकाम सुरू आहे. रेतीशिवाय हे बांधकाम शक्य नाही. तसेच रॉयल्टी देऊन रेतीची विक्री करणेही कंत्राटदारांना शक्य नसल्याने मोठ्या प्रमाणावर अवैध खनन करून विक्री केली जात आहे. सुर्योदयापासून तर सूर्यास्तपर्यंतच खनन करता येते. परंतु, तालुक्यातील काही रेती घाटांवरून पोकलँडचा वापर करून रात्रीबेरात्री अवैध खनन करून वाहतुक केली जात आहे. या रेती वाहतुकीमुळे काही गावांतील रस्ते खराब झाल्याचा आरोप नागरिकांनी केला. तालुक्यातील काही रेती घाटातून नांदेड जिल्ह्याची रॉयल्टी तयार करून हॉयवा ट्रकच्या माध्यमातुन जिल्ह्यात एकाच रॉयल्टीवर दिवसभर रेती वाहतूक असल्याने तालुका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.तालुक्यातील बहुतेक घाटांचे लिलाव झाले असून या घाटातून रेतीची वाहतुक झाली पाहिजे याकडे लक्ष दिले जात आहे. रेती वाहतुक बाहेरून होत असल्यास कारवाई करण्यासाठी भरारी पथक तयार करण्यात आले. या पथकाच्या माध्यमातुन लक्ष देणे सुरू आहे.राजेश सरवदे, तहसीलदार, मूल