शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोळशाच्या ट्रकमधून होतेय दारूची तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2016 00:31 IST

जिल्ह्यात दारूबंदी असताना दारू विक्रेत्यांनी दारू तस्करीसाठी नवनवे फंडे वापरणे सुरू केले आहे.

नवा फंडा : पोलीस यंत्रणाही झाली बेजारगोवरी : जिल्ह्यात दारूबंदी असताना दारू विक्रेत्यांनी दारू तस्करीसाठी नवनवे फंडे वापरणे सुरू केले आहे. दारू व्यवसायातून दामदुप्पट नफा कमविण्याच्या उद्देशाने पोलिसांची दिशाभूल करीत अवैध दारू जिल्ह्यात आणून ती विकण्याचा सपाटा सुरू आहे. आता तर चक्क कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून दारूची तस्करी केली जात असल्याचा प्रकार उजेडात आल्याने पोलीस यंत्रणाही दणाणून गेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी होऊन ११ महिन्यांचा कालावधी लोटला. दारूबंदीची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी राज्याच्या व जिल्ह्याच्या सिमेवर पोलीस तपासणी नाके उघडण्यात आले. यात दारूबंदीची कडक अंमलबजावणी करीत अनेक दारू तस्करांना अटक करून कारवाई करण्यात आली. दारू विक्रीच्या काळ्या व्यवसायात चौपट नफा कमविण्याच्या उद्देशाने या दारू तस्करीच्या धंद्यात तरूण बेरोजगारांची फौज उतरली आहे.दारूबंदी झाल्यानंतर जिल्ह्यात दारूचा थेंबही मिळणार नाही, अशी चर्चा सर्वच स्तरावर झाली. मात्र त्या उलट चित्र जिल्ह्यात आहे. मोबाईलवरून आॅर्डर दिली की, दारू थेट तुमच्या दारापर्यंत आणून पोहचविली जात आहे. हा प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.पोलीस यंत्रणेची दिशाभूल करून दारू जिल्ह्यात आणण्याचा सपाटा दारू तस्करांनी लावला आहे. यात आडमार्गाने दारू आणून ती गावागावांत विकल्या जात आहे. हे दारू तस्कर परजिल्ह्यातून दारू आणण्यासाठी नवनवे फंडे वापरत आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणाही हैराण आहे. आता तर चक्क कोळशाच्या ट्रकमधून दारूची तस्करी केली जात आहे. बहुतांश ट्रक कोळसा घेऊन जिल्ह्याबाहेर किंवा परप्रांतात जातात. याच संधीचा फायदा घेऊन दारू तस्करांनी कोळशाच्या ट्रकमधून दारू आणण्याचा सपाटा सुरू केला आहे. दामदुप्पट नफा कमविण्याच्या उद्देशाने या व्यवसायात लहानापासून थोरापर्यंत अनेकजण गुंतले आहेत. राजुरा तालुक्यातील गोवरी, पोवनी, साखरी या वेकोलिच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध दारूचा महापूर वाहत आहे. काही ठिकाणी रात्रीच्या सुमारास राजरोसपणे दारू आणून विकली जात आहे. (वार्ताहर)