शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात धुव्वाधार पाऊस

By admin | Updated: August 12, 2015 00:44 IST

चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील अन्य भागातही मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह धुव्वाधार ...

जनजीवन विस्कळीत : रस्त्यावर पाणी तुंबले, नागरिकांचे हालचद्रपूर : चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील अन्य भागातही मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह धुव्वाधार पाऊस कोसळला. सुमारे एक ते दीड तास बरसलेल्या या पावसाने चंद्रपूर शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. सखोल भागातील रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झालेत. जवळपास दोन ते अडीच फूट पाणी साचल्याने दुचाकीधारकांना रस्त्यावरच वाहने उभी करून सुरक्षित स्थळ गाठावे लागले. सायंकाळी ४ वाजतानंतर मात्र पाऊस ओसरला. सकाळपासूनच वातावरणात उकाडा जाणवत होता. दुपारी १२ वाजतानंतर आकाशात ढगांनी गर्दी केली. दुपारी १.३० वाजता मुसळधार पाऊस सुरू झाला. तो तब्बल एक ते दीड तास कोसळला. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी चंद्रपूर शहरातील सखल भागात पाणी साचल्याने या पाण्यात दुचाकी वाहने फसली. पाण्यातून वाहन बाहेर काढता येत नसल्याने अनेकांनी रस्त्यावरच वाहने उभी केली आणि जवळचा निवारा शोधला. नेहमीप्रमाणे आझादबागेलगतचे वाहनतळात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. या पावसामुळे पिकांनाही चांगलाच दिलासा मिळाला आहे. सोयाबीन, कपाशी, धान आदी पिकांसाठी हा पाऊस संजीवनी देणारा ठरला. हा पाऊस जिल्ह्यातील कोरपना, भद्रावती, वरोरा, जीवती, सिंदेवाही, घुग्घूस, मूल, गोंडपिपरी, राजुरा, पोंभुर्णा, सावली, नागभीड, ब्रह्मपुरी, चिमूर आदी तालुक्यात कमी अधिक प्रमाणात कोसळला. (प्रतिनिधी)