शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सेल्फीचा नाद करायचा नाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 22:39 IST

मोबाईल आज सर्वांसाठी आवश्यक गरज झाली आहे. लहान असो की, मोठे सर्वांनाच मोबाईलचे वेड लागले आहे. त्यात आपले वेगवेगळे छायाचित्र काढण्यासाठी तरुण- तरुणींना सेल्फीने वेड लागले आहे. वाटेल तेथे व आहे त्या स्थितीत वेगवेगळे सेल्फी काढण्याचे प्रकार वाढत आहे. वाहन चालवितांनाही सेल्फी काढण्याचे प्रमाण वाढले असून अपघाताच्या घटना घडत आहे. त्यामुळे वेळीच सावध होऊन सेल्फीचा अतिरेक कमी करणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देवाहतूक नियमांचे करा पालन : अपघात टाळण्यासाठी पुढाकाराची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मोबाईल आज सर्वांसाठी आवश्यक गरज झाली आहे. लहान असो की, मोठे सर्वांनाच मोबाईलचे वेड लागले आहे. त्यात आपले वेगवेगळे छायाचित्र काढण्यासाठी तरुण- तरुणींना सेल्फीने वेड लागले आहे. वाटेल तेथे व आहे त्या स्थितीत वेगवेगळे सेल्फी काढण्याचे प्रकार वाढत आहे. वाहन चालवितांनाही सेल्फी काढण्याचे प्रमाण वाढले असून अपघाताच्या घटना घडत आहे. त्यामुळे वेळीच सावध होऊन सेल्फीचा अतिरेक कमी करणे गरजेचे आहे.कुठलेही भान न ठेवता कोणत्याही क्षणी व अकारण होणारे सेल्फी चित्रण सध्या समस्या ठरत आहे. सार्वजनिक व कौटुंबिक कार्यक्रमात सेल्फीच्या नादात होणाऱ्या बेभान हालचाली संशोधनाचा विषय ठरत आहे.लग्न समारंभासारखे आनंदाचे क्षण असो किंवा दु:खद घटना. त्याचे होणारे चित्रण म्हणजे एक प्रकारची अवहेलना होताना दिसत आहे. यामुळे आपला मोबाईल प्रोफाईल तर छान निघतील पण व्यक्तीगत प्रोफाईल खरब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रत्येकाच्या हातात मोबाईल हा विषय आता काही नवीन नाही, त्याबरोबर नवीन तंत्रज्ञान म्हणजे पर्वणी, मॉडर्न युगात तंत्रज्ञान माणसाला मिळालेले वरदान आहे. याला चांगल्या प्रकारे वापरल्यास त्याचा फायदा होतो. मात्र अतिरेक केला तर त्यापासून नुकसानही होते. प्रत्येकाने आपापल्या परीने असलेल्या साधनांचा वापर करुन पाहिजे त्यावेळी हवे तेवढे फोटो काढणे फॅशन झाली आहे.विशेष म्हणजे, पूर्वी सारखे रोल खराब व्हायची भीती पण नाही. हवे तेवढे काढा आणि पाहिजे तेवढे ठेवून बाकीचे डिलीट करता येतात. यामुळे नुकसान किंवा फायद्याची भीतीची नाही. लग्न समारंभात जाण्याचा योग हल्ली वाढला आहे. वर-वधूचे होणारे छायाचित्रण समजण्यासारखे आहे. पण वर-वधूच्या मंचावर येणारे युवक- युवतीचे सुरु असलेले सेल्फी प्रदर्शन चाळयासारखे वाटतात. एकीकडे होणारी धार्मिक विधी आणि दुसºया बाजूला होणारे सेल्फी चित्र हास्यास्पद तेवढेच लाजिरवाना प्रकार वाटतो.बेभान क्लिकएखाद्या समारंभात पाहूने मंडळीची रेलचेल आणि सेल्फी काढणाऱ्यांची बेभान क्लिक हसू तेवढे राग आणणारे असते. विशेष म्हणजे, या सेल्फीच्या नादात कित्येक अपघात घडले आहेत. वाहन चालविताना किंवा धोकादायक जागेवर उभे राहून सेल्फी काढल्याने जिवावरही बेतले आहे.