शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

वृक्षारोपणासाठी झाडांची कत्तल

By admin | Updated: May 29, 2017 00:27 IST

येरुर ते ताडाळी ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या ताडाळी-येरूर रस्त्यालगतची १० ते १५ वर्ष वयाच्या झाडांची जेसीबी लावून कत्तल करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे.

१० ते १५ वर्षांची झाडे : येरुर ग्रामपंचायतीचा प्रतापलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येरुर ते ताडाळी ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या ताडाळी-येरूर रस्त्यालगतची १० ते १५ वर्ष वयाच्या झाडांची जेसीबी लावून कत्तल करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे. शासनाचा संकल्प झाडे लावण्याचा असला तरी वृक्षारोपणाच्या नावाखाली जुनी झाडे मुळासकट उपटून टाकण्याचा हा प्रकार येरुर ग्रामपंचायतीने केला आहे. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.चंद्रपूर जिल्हा प्रदूषण, तिव्र उष्णतामान यामुळे राज्यभर प्रसिध्द आहे. औद्योगिक जिल्हा म्हणून नावारुपास आलेल्या चंद्रपूरचे प्रदूषण मात्र मागील अनेक वर्षांपासून कमी झालेले नाही. आणखी ते दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. कारखान्यांमुळे वनसंपदा नष्ट होत असून उष्णतामानातही वाढ होत आहे. उन्हाळ्यात राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूरचे नोंदविले जाते. यावर्षीही चंद्रपूरने आपला हा रेकॉर्ड कायम ठेवला आहे. यावर काही प्रमाणात मात करण्यासाठी झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड होणे गरजेचे आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून शासनाच्या वतीने वृक्षलागवडीचा व्यापक उपक्रम मागील वर्षी राबविण्यात आला. यंदाही याची व्याप्ती आणखी वाढवून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे.एकीकडे वृक्षलागवडीच्या जनजागृतीसाठी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे १० ते १५ वर्ष वयाची जिवंत झाडे तोडली जात आहे. येरुर ग्रामपंचायतीने येणाऱ्या पावसाळ्यात झाडे लावण्यासाठी येरुर-ताडाळी या रस्त्यालगतच्या दोन्ही बाजुने २० फूट अंतरावर डौलात उभी असलेली झाडे जेसीबीच्या साहाय्याने पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आली. शासनाचा संकल्प झाडे लावण्याचा असला तरी येरुर ग्रामपंचायतीने याला बगल दिली आहे.ग्रामपंचायतीच्या या कृत्याचा येरुर येथील परशुराम नरसू निखाडे व ग्रामस्थांनी विरोध केला आहे. येरुर ग्रामपंचायतीने मोठी प्रसिध्दी मिळविण्यासाठी आधीच अस्तित्वात असलेली ही झाडे तोडल्याचा आरोप निखाडे यांनी केला आहे. रस्त्याच्या बाजुने २० फूट अंतरावरील झाडे तोडल्यानंतर त्या ठिकाणी नवीन झाडे लावण्यासाठी जेसीबीनेच खड्डे खोदण्यात येत आहेत.या संदर्भात निखाडे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. झाडे तोडल्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले असून या संदर्भात मोका चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली आहे.सागवानाची शेकडो झाडे तोडलीजिवती तालुक्यातील येरमीयेसापूर येथील संतोष पेठे व अशोक पेठे यांनी वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण केले आहे. या जागेवर असलेली सागवानाची शेकडो झाडे पेठे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना भुलथापा देऊन तोडल्याचा आरोप येरमीयेसापूर येथील गोविंदराव कुमरे यांनी केला असून या संदर्भात त्यांनी वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.