शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

राजुरा वनपरिक्षेत्रात १४ सागवृक्षांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 23:27 IST

राजुरा वनपरिक्षेत्रातील सुमठाणा कक्ष क्रमांक १६६ मध्ये अज्ञात चोरट्यांनी तब्बल १४ सागाच्या वृक्षांची कत्तल करून ते ट्रकमध्ये ेटाकले.

ठळक मुद्देपावसामुळे चोरीचा बेत फसला : ट्रकसह तीन लाख ८० हजारांचे सागवान जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : राजुरा वनपरिक्षेत्रातील सुमठाणा कक्ष क्रमांक १६६ मध्ये अज्ञात चोरट्यांनी तब्बल १४ सागाच्या वृक्षांची कत्तल करून ते ट्रकमध्ये ेटाकले. मात्र पावसाने ट्रक फसल्याने चोरीचा बेत फसला. ही घटना सोमवारी उघडकीस आली. घटनास्थळावरून ट्रकसह तीन लाख ८० हजारांची सागाची लाकडे वनविभागाने जप्त केली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध वनअधिनियम कायदा १९२७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.सुमठाणा कक्षात सागाच्या झाडांची कत्तल करून लाकडे एमएच १९ झेड २४२८ क्रमांकाच्या ट्रकमध्ये टाकून असल्याची बाब गावकरी व वनमजुरांच्या निदर्शनास आली. यानंतर राजुरा वनपरिक्षेत्राधिकारी अशोक मेडपल्लीवार यांना याची माहिती देण्यात आली. त्यांनी सहकाºयांसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला असता तब्बल १४ सागांच्या वृक्षांची कत्तल केल्याचे दिसून आले. या कटाई केलेल्या झाडांचे प्रत्येकी पाच घनमीटर आकाराची तब्बल ५७ नग लाकडे कापून त्यातील १८ नग लाकडे ट्रकमध्ये ठेवण्यात आली होती, तर उर्वरित ३९ नाग लाकडे ट्रकच्या बाजूला टाकून ठेवलेली होती. त्या परिसरात चोरट्यांचे कपडे आणि आºया, भोसे हे साहित्यही पडून असल्याचे आढळले. चोरटे रात्रीलाच आले असून त्यांनी तब्बल १४ साग वृक्षांची कत्तल करून ती लाकडे ट्रकमध्ये भरली. मात्र रात्री पाऊस आल्यामुळे ट्रक फसला. अशातच सकाळ झाल्यामुळे चोरटे घटनास्थळावरून पसार झाल्याचा कयास वनविभाग लावत आहे. वनविभागाच्या नाकावर टिचून जंगलातील सागवृक्षांची कत्तल करण्यात आली. पावसामुळे ही घटना उघड झाली.पाऊस आला नसता तर चोरट्यांचा बेत यशस्वी झाला असता. चोरट्यांनी केवळ एका रात्रीतून प्रकार केला नसावा, मात्र याची भनक वनविभागाला लागू नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होते वा नाही, याकडे लक्ष लागले आहे.