शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

शक्तिशाली ब्लास्टिंगने स्लॅबचे सिलिंग कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:20 IST

राजुरा तालुक्यातील गोवरी येथे शक्तीशाली ब्लास्टिंगने बंडू भुसे यांच्या घराच्या स्लॅबची सिलिंग अचानक कोसळली. सुदैवाने या घटनेत भुसे कुटुंबीय बचावले. यात मोठा अनर्थ टळला. ही घटना गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देगोवरी येथील घटना : सुदैवाने भुसे कुटुंबीय बचावले

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : राजुरा तालुक्यातील गोवरी येथे शक्तीशाली ब्लास्टिंगने बंडू भुसे यांच्या घराच्या स्लॅबची सिलिंग अचानक कोसळली. सुदैवाने या घटनेत भुसे कुटुंबीय बचावले. यात मोठा अनर्थ टळला. ही घटना गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.राजुरा तालुक्यातील गोवरी येथील बंडू भुसे यांच्या राहत्या घराची स्लॅबची सिलिंग गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास अचानक कोसळली. दुपारी रखरखते उन्ह असल्याने भुसे यांचे कुटुंबीय घरीच होते. मात्र अचानक वेकोलितील शक्तीशाली ब्लास्टिंगचा हादरा बसला. या शक्तीशाली स्फोटाने बंडू भुसे यांच्या राहत्या घरातील स्लॅबचे सिलिंग अचानक कोसळले. यात प्लास्टिकची एक खूर्ची पूर्णत: तुटली आहे. ज्या ठिकाणी स्लॅबची सिलिंग कोसळली, त्या ठिकाणी भुसे कुटुंबातील सदस्य काही वेळासाठी दुपारी आराम करीत होते. मात्र ते पाच मिनिटापूर्वीच तिथून उठून गेल्याने मोठा अनर्थ टळला. घटना घडली तेव्हा भुसे यांचा मुलगा तिथेच बाजूला बसून होता.मात्र नशिब बलवत्तर म्हणून सुदैवाने त्याला कुठलीच दुखापत झाली नाही. गोवरी गाव वेकोलिच्या कोळसा खाणीला लागून आहे. वेकोलित कोळसा उत्खननासाठी वेळी-अवेळी शक्तीशाली ब्लास्टिंग करुन स्फोट घडवून आणतात. त्यामुळे बहुतांश घरांना तडे गेले आहे तर ब्लास्टिंगमुळे घर कोसळल्याच्या घटना यापूर्वी गोवरी येथे घडल्या आहेत. गावकऱ्यांनी वेकोलिला अनेकदा निवेदन देऊन ब्लास्टिंगची तिव्रता कमी करण्याचे सांगितले होते. मात्र वेकोलि प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आजची घटना घडली. सुदैवाने या घटनेत अख्खे कुटुंबीय बचावले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.काळ आला; पण वेळ आली नव्हतीगोवरी येथील बंडू भुसे यांच्या घराच्या स्लॅबची सिलिंग कोसळली, तेव्हा कुटुंबीय दुपारी १ वाजताच्या सुमारास घरीच होते. मात्र काही वेळापूर्वी ते तिथून उठून गेल्यामुळे सुदैवाने सर्व बचावले.गोवरी येथे अनेक घरांना तडेगोवरी गावाला वेकोलिची खदान अगदी लागून आहे. वेकोलित वेळीअवेळी करण्यात येणाऱ्या ब्लास्टींगने अनेक घरांना तडे गेले आहे. त्यामुळे यासारखी शक्तीशाली ब्लास्टिंग होऊन एखादवेळी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.