शहरं
Join us  
Trending Stories
1
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
2
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
3
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
4
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
5
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
6
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
7
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
8
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral
9
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
10
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
11
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
12
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
13
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
14
'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
16
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
17
'या' गोष्टींमुळे सुशांत सिंह राजपूत मृत्यूपूर्वी होता त्रस्त, मनोज वाजपेयी यांचा मोठा खुलासा, म्हणाले....
18
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
19
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
20
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'

चंद्रपुरातील टंचाईग्रस्त भागासाठी सहा टँकर सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 11:18 PM

शहरातील विविध वॉर्डांत संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मनपाच्या वतीने ६ टँकरची व्यवस्था करण्याचा निर्णय आढावा सभेत घेण्यात आला.

ठळक मुद्देमनपा आढावा बैठक : विविध विकास कामांवर चर्चा

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शहरातील विविध वॉर्डांत संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मनपाच्या वतीने ६ टँकरची व्यवस्था करण्याचा निर्णय आढावा सभेत घेण्यात आला.स्थायी सभापती राहुल पावडे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी उपमहापौर अनिल फुलझेले, शहर अभियंता महेश बारई, शाखा अभियंता विजय बोरीकर, शाखा अभियंता अनिल घुमडे, अभियंता संजय जोगी उपस्थित होते. शहरात विशेष निधीअंतर्गत विविध कामे सुरू आहेत. त्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष निधी दिला. संबंधित कंत्राटदारांच्या कामाची गती वाढवावी आणि सुरू असलेली कामे शीघ्रगतीने विहित मूदतीत पूर्ण करावी. यासाठी अधिकाºयांनी दिवसागणिक कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देशही या बैठकीतून देण्यात आले.शासनाची स्वयंचलित पाणी पुरवठा योजना अमृत अंतर्गत शहरात पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु आहे. पुढील ५० वर्षांची आवश्यकता लक्षात घेवून पाईपलाईन टाकताना आवश्यक तेवढेच खोदकाम करावे. पाईपलाईन उपलब्ध नाही, अशी परिस्थिती निर्माण होवू नये.खोदकामातून निर्माण होणारा मातीचा ढिगारा, धुळीचा त्रास सामान्य नागरिकांना होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याची सूचना कंत्राटदारांना देण्यात आली. त्रासदायक ठिकाणी कंत्राटदारांनी कामगार लावून साफसफाई करावी, खोदकाम परिसराची रोज एका ठराविक वेळेत पाहणी करून विकासकामे पूर्ण करण्याची सूचना देण्यात आली.मनपा अधिकाºयांनी पाणी टंचाईबाबत सुरू केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती या आढावा बैठकीत सादर केली. शहरातील टंचाईग्रस्त भागात पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने विहिरींची साफसफाई, खोलीकरण व दुरुस्ती केली जात आहे. हातपंप व कूपनलिका दुरुस्त करण्यासोबतच पाईप लाईन गळती बंद करण्याचे काम वेगाने सुरू आहे.टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा करण्यासाठी शहरात ६ टँकर सज्ज ठेवण्यात आले आहेत. इरई धरण परिसरात विहिरी सभोवताल मातीचा बंधारा बांधण्यात येणार आहे. तसेच १० अतिरिक्त पंप लावून पाणी उचल करण्याची कार्यवाही लवकरच सुरू होईल, अशी माहिती उपमहापौर फुलझेले व सभापती पावडे यांनी दिली. दाताळा येथील इरई नदीवर बंधारा बांधून शहरातील ४ विहिरींवर पंप लावण्याची प्रक्रिया केली जात आहे. हे काम झाल्यास उन्हाळ्यातील पाणी टंचाईवर पूर्णत: मात करता येईल. शहरात विविध भागात कुपनलिका, हातपंप, विहिरीवर पंप बसविणे तसेच म्हाडा परिसरातून पाणी आणण्याकरिता शासनाकडून जादा मिळणार आहे, असा दावाही बैठकीत करण्यात आला.