शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

नवरगाव ग्रामपंचायतीला पाच वर्षात सहा ग्रामविकास अधिकारी

By admin | Updated: May 18, 2016 00:53 IST

ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक हा त्या-त्या गावाचा विकासाचा कणा असतो. परंतु सिंदेवाही तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत ...

विकास खोळंबला : ग्रामविकास अधिकाऱ्याविना ग्रामपंचायतनवरगाव : ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक हा त्या-त्या गावाचा विकासाचा कणा असतो. परंतु सिंदेवाही तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या नवरगाव ग्रामपंचायत कार्यालयात पाच वर्षात सहा ग्रामविकास अधिकारी बदलून गेल्याने विकास कामांना खिळ बसली असून नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.नवरगाव १५ हजार लोकसंख्येचे गाव असून तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. या ठिकाणी १७ सदस्य असून २० कर्मचारी ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत आहेत. ग्रामविकास अधिकाऱ्याचे पद आहे. आतापर्यंत प्रिती चिमूरकर, व्ही.एल. मेश्राम, प्रिती वी. कुंभरे, बी.सी. शंभरकर, किर्तीमंत मगर, ए.के. सुखदेवे अशा पद्धतीने विविध कारणाने मागील पाच वर्षांच्या कालावधीमध्ये सहा ग्रामविकास अधिकारी बदलून गेलेत. नुकतेच आलेले सुखदेवे हे अवघ्या एक महिन्याच्या कालावधीतच बदलून गेले. सध्या या ग्रामपंचायतीत ग्रामविकास अधिकारी नसल्याने सदर पद रिक्त आहे.नागरिकांना विविध दाखल्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये यावे लागते. बऱ्याच दाखल्यावर ग्रामविकास अधिकाऱ्याचीच सही लागत असल्याने नागरिकांना ग्रामपंचायतीचे उंबरठे वारंवार झिजवावे लागत आहे. अलिकडे उन्हाळा असल्याने घरकूल शौचालयाचे बांधकाम जोमात सुरू आहेत. ते पूर्ण बांधून झाल्यानंतर ग्रामविकास अधिकारी यांचा पूर्ण बांधकाम झाल्याचा दाखला लागतो. परंतु सदर पद रिक्त असल्याने दाखला मिळणे कठीण झाले आहे. धुमनखेडा येथील भास्कर नन्नावरे यांनी घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले. मात्र दाखल्याअभावी त्यांना बिल मिळणे कठीण झाले आहे.नवरगावातील विकासकामेही रखडलेली आहेत. पाच वर्षात सहा ग्रामविकास अधिकारी बदलत असतील तर त्या गावाचा विकास साधण्यासाठी विविध अडचणी निर्माण होत असल्याने नवरगावसाठी लवकर नवीन ग्राम विकास अधिकारी देण्याची मागणी आहे. (वार्ताहर)