शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

शिर्शीत सहा महिन्यांनी पुन्हा बिबट्याचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:00 IST

तालुक्यातील शिर्शी गावात बिबट्याने धुमाकूळ घालून सहा शेळ्यांना ठार केले. पाच-सहा महिन्यांपूर्वी याच गावातील खुशी या पाच वर्षीय बालिकेला बिबट्याने घरातून उचलून नेण्याची घटना घडली होती.

ठळक मुद्देसहा शेळ्यांचा मृत्यू : तेव्हा मुलीला घरातून नेले होते

लोकमत न्यूज नेटवर्कसावली : तालुक्यातील शिर्शी गावात बिबट्याने धुमाकूळ घालून सहा शेळ्यांना ठार केले. पाच-सहा महिन्यांपूर्वी याच गावातील खुशी या पाच वर्षीय बालिकेला बिबट्याने घरातून उचलून नेण्याची घटना घडली होती. दुसऱ्यांदा पुन्हा बिबट्याने गोठ्यात शिरून सहा शेळ्या मारल्याने गाव परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.किसन पुंजाजी निकुरे यांचे कुटुंबीय गुरुवारी रात्री झोपेत असताना सदर घटना घडल्याचे बोलले जाते. शुक्रवारी सकाळी निकुरे कुटुंबीय उठल्यानंतर त्यांना गोठ्यातील शेळ्या मृतावस्थेत आढळून आल्या. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून त्यात निकुरे यांचे २६ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. वनविभागाच्या चमूने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. पुढील तपास वनपरिक्षेत्राधिकारी जी.व्ही. धडे, व्याहाड खुर्दचे क्षेत्र सहायक बुराडे व शिर्शीचे वनरक्षक शंकर देठेकर करीत आहेत.त्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नयेसहा महिन्यांपूर्वी शिर्शी येथील खुशी नामक बालिकेला जेवण्याच्या ताटावरून बिबट्याने उचलून नेले होते. घटनेनंतर बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरे लावले होते. मात्र बिबट पिंजºयात अडकला नाही. दुसºयांदा पुन्हा गावात बिबट्याने प्रवेश करून सहा शेळ्यांना ठार केले आहे. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वीच्या घटनेची पुनरावृत्ती होणार तर नाही ना, अशी भीती गावकºयांना आहे.