शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यात वरातीचा मेटॅडोर उलटून चार ठार; दारु पिऊन चालवली गाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 15:44 IST

Chandrapur News लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाडी मंडळीचा टेम्पो उलटून झालेल्या अपघातात चारजण जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी दुपारी येथे घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: लग्न आटोपून परत निघालेल्या वऱ्हाडी मंडळीचा मेटॅडोर उलटून झालेल्या अपघातात चार जण जागीच ठार झाल्याची घटना सिंदेवाही तालुक्यातील कच्चेपार गावाजवळ गुरुवारी दुपारी घडली.रत्नापूर येथे लग्न आटोपून हा मेटॅडोर (क्र. एम.एच. ३१ पी क्यू ३९१५) सिंदेवाहीतील एकारा येथे जात होती.  लग्नात दारु पिऊन धुंद झालेल्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ही मेटॅडोर झाडावर जाऊन आदळली. ही धडक इतकी भीषण होती की, हा मेटॅडोर संपूर्णपणे उलटला व त्यातील वऱ्हाडी मंडळी एकमेकांवर आदळून दबली गेली. अपघातग्रस्त व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली. या अपघातात दोन महिला व दोन पुरुष जागीच गतप्राण झाले तर २५ जण गंभीर जखमी झाले आहेत. या परिसरात सर्वत्र सामान विखुरलेले व रक्ताचा सडा पडल्याचे दृश्य पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा आणत होते. या घटनास्थळापासून जवळच रेल्वेचे फाटक आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी हे फाटक ओलांडून जावे लागणार होते. येथून जात असलेल्या मालगाडीला नागरिकांनी काही काळासाठी रोखून धरले व जखमींना रुग्णवाहिकेतून रेल्वे रुळ ओलांडून नेण्यासाठी मदत केली. 

टॅग्स :Accidentअपघात