शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

आयुध निर्माणीतील सहा कर्मचारी निलंबित

By admin | Updated: March 4, 2016 00:57 IST

येथील आयुध निर्माणीमधून ओडीसा राज्यातील बोलंगीर येथे आयुध निर्माणीत डेप्युटेशनवर पाठविण्यात आलेले वाहन वेळेवर पोहचले नाही.

भद्रावती: येथील आयुध निर्माणीमधून ओडीसा राज्यातील बोलंगीर येथे आयुध निर्माणीत डेप्युटेशनवर पाठविण्यात आलेले वाहन वेळेवर पोहचले नाही. त्यामुळे तिथून आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरुन येथील महाव्यवस्थापकांनी सहा कामगारांना निलंबित केल्याची खात्रीलायक माहिती आहे. या संदर्भात आयुध निर्माणीच्या महाप्रबंधकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही. आठवड्यापूर्वी आयुध निर्माणी चांदा येथून डेप्युटेशनवर काही साहित्य घेऊन एक ट्रक ओडीसातील बोलंगीर येथील आयुध निर्माणीकडे रवाना झाला. यावेळी निर्माणीतील सहा कर्मचारी होते. त्यात एक चालक, दोन डीएससी जवान तर तीन कामगारांचा समावेश होता. सदर कर्मचारी वेळेच्या आत न पोहोचल्याने बोलंगीर आयुध निर्माणीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथील महाप्रबंधकांकडे तक्रार केली. वेळेनंतर पोहचलेल्या कर्मचाऱ्यांना ही बाब माहीत झाल्यानंतर उशिरा पोहचण्यासाठी तूच जबाबदार आहे, असे एकमेकांवर आरोप करुन एकमेकांशी भांडू लागले. ही तक्रारसुद्धा येथील महाप्रबंधकांकडे प्राप्त झाली. सर्व कर्मचारी डेप्युटेशनवर येथे २ मार्चला पोहोचल्यानंतर महाप्रबंधकांनी त्यात सर्वांना दोषी ठरवित निलंबित केल्याची माहिती आहे. यासंदर्भात खरी माहिती जाणून घेण्याकरिता महाप्रबंधकांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता वार्ताहर असल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी फोन ठेवून दिला.त्यातच निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांपैकी एक कर्मचारी हा आयुध निर्माणी वसाहतीमधील डीएससी या भागात दारू विक्री करतो. त्यामुळे या ट्रकद्वारे अवैध दारूची वाहतूक करीत असल्याच्या सूचनेवरुन येथील कर्णलने प्रत्यक्ष झडती घेतल्याची कामगारात चर्चा आहे. (शहर प्रतिनिधी)