जिल्हा नक्षलमुक्त झाल्याचा शासनाला फायदा : कर्मचाऱ्यांत मात्र तीव्र नाराजीमंगेश भांडेकर - चंद्रपूरनक्षलग्रस्त क्षेत्रातून चंद्रपूर जिल्ह्याला वगळण्यात आल्याने शासनाच्या तिजोरीवरील तब्बल सहा कोटी रुपयांचा बोजा हलका झाला आहे. मात्र, शासनाच्या या निर्णयाविरोधात शासकीय कर्मचाऱ्यांत तीव्र असंतोष पसरला असून शासनाने नक्षलग्रस्त क्षेत्रात चंद्रपूर जिल्ह्यातील काही तालुक्यांचा समावेश करुन घ्यावा, यासाठी आंदोलन सुरु केली आहेत. शासन निर्णयानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, गोंडपिंपरी, राजुरा, कोरपना, जिवती, बल्लारशहा, पोंभुर्णा, मूल, आणि सावली या तालुक्यांना नक्षलग्रस्त तालुके म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यापोटी या नक्षलग्रस्त तालुक्यात सेवा देणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना दरमहा दीड हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता आणि एकस्तर वेतनश्रेणी दिली जात होती. गेल्या दहा वर्षापासून या नक्षलग्रस्त तालुक्यात कार्यरत हजारो शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासनाच्या भत्त्याचा लाभ मिळत होता. जानेवारी २०१४ मध्ये राज्याच्या पोलीस महासंचालकांकडून नक्षलग्रस्त क्षेत्राचा फेरआढावा घेण्यात आला. यात चंद्रपूर जिल्ह्यातील सातही तालुक्यांत नक्षलवाद्यांच्या कोणत्याही कारवाया नसल्याचे आढळून आले. तसा अहवाल १७ आॅक्टोंबर २०१४ ला महासंचालकांनी शासनाला दिला. त्यानंतर राज्य शासनाने २६ डिसेंबर २०१४ ला परिपत्रक काढून चंद्रपूर, गोंडपिंपरी, राजुरा, कोरपना, जिवती, बल्लारशहा, पोंभुर्णा, मूल, आणि सावली या तालुक्यांना नक्षलग्रस्त क्षेत्रातून वगळले. चंद्रपूर जिल्ह्यात महसूल विभाग, वनविभाग, जिल्हा परिषद, वीज वितरण, महानगरपालिका, नगरपालिकांमध्ये ३४ हजार २९१ अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी अंदाजे १५ हजार कर्मचारी चंद्रपूर, गोंडपिंपरी, राजुरा, कोरपना, जिवती, बल्लारशहा, पोंभुर्णा, मूल, आणि सावली या तालुक्यांत सेवा देणारे असे गृहीत धरल्यास या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता आणि एकस्तर वेतनश्रेणी स्वरुपात कमी-जास्त ४ हजार रुपये मिळत होते.मात्र, नक्षलग्रस्त भागातून जिल्ह्याला वगळल्याने अ, ब दर्जाच्या अधिकाऱ्यांचे वेतन दहा ते १५ हजार रुपयांने तर चर्तुथ श्रेणी कर्मचाऱ्यांचे वेतन दोन ते तीन हजार रुपयांनी कपात झाले आहे. म्हणजेच दर महिन्याला १५ हजार कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता व आणि एकस्तर वेतनश्रेणीच्या स्वरुपात दिले जाणारे शासनाचे सहा कोटी रुपये आता बचत होणार आहेत.संघटनांचे आंदोलन४राज्य शासनाने चंद्रपूर जिल्ह्याला नक्षलग्रस्त भागातून वगळल्याने शासकीय कर्मचारी तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. विविध संघटनांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु केले असून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन पाठवून जिल्ह्याचा समावेश नक्षलग्रस्त भागात करण्याची मागणी करीत आहेत. जिल्ह्यात नक्षल कारवाया सुरुच असल्याचे या संघटनांचे म्हणणे आहे.सर्वच कर्मचारी चिंतेत नक्षलग्रस्त भागात कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता व एकस्तर वेतन मिळत असल्यामुळे अनेकांना जिल्ह्यात सेवा देण्याचा लाभ मिळत होता. सुरक्षित स्थळी राहून शासनाकडून भत्ता स्वरुपात मिळणारी रक्कम पचवण्याची अनेकांना सवय झाली. मात्र, नक्षलग्रस्त भागातून जिल्ह्याला वगळल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांचा चांगलाच मनस्ताप वाढला आहे. शासकीय कार्यालयात कामानिमीत्त्य आलेल्या नागरिकांनाही ते आपले गाऱ्हाणे सांगताना दिसतात. अशी आहे कर्मचारी संख्याचंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत वर्ग अ चे १९३, वर्ग ब मध्ये १०५५, वर्ग क मध्ये ७८८८ तर ड वर्गात १०६३ कर्मचारी कार्यरत आहेत. महसूल विभागात १६ हजार ५८७, पोलीस विभागात ३ हजार २३३, नगरपालिका येथे २ हजार ७०९ कर्मचारी कार्यरत आहेत.
शासनाच्या तिजोरीवरील सहा कोटींचा बोजा हलका
By admin | Updated: February 4, 2015 23:10 IST