शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

एपीएलएल कंपनी प्रकरणातील सहा आरोपी मोकाट

By admin | Updated: August 23, 2014 01:40 IST

आयटीची पदविका देण्याचे आश्वासन दाखवून विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या दोन कंपन्यांचे एजंट अद्यापही मोकाट आहे.

लखमापूर : आयटीची पदविका देण्याचे आश्वासन दाखवून विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या दोन कंपन्यांचे एजंट अद्यापही मोकाट आहे. यातील अन्य आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.आयटीची पदविका देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. क्लॉसम कॅम्प्यूटर इंस्टिट्यूटचे संचालक गौस सिद्दीकी याला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली. त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुटका करण्यात आली. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अतुल कोहपरे, संजय निमगडे, सचिन मडावी, हेमंत कुळसंगे, अर्जून अलाम, समय्या पनेट्टीवार यांना अद्यापही अटक करण्यात आली नाही. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावल्या जात आहे. कंपनीच्या नावाने ८७९९ रुपयांचा डी.डी. काढून विद्यार्थ्यांना आयटीचा डिप्लोमा देण्यात येणार होता. त्यामुळे कोरपना तालुक्यातील गडचांदूर, नांदाफाटा, लखमापूर, पिंपळगाव, हरदोना, मानोली, सोनुर्ली, नारंडालोणी, कळमना, चिंचोली, तळोधी, खिर्डी, कवठाळा तसेच राजुरा व जिवती तालुक्यातील विद्यार्थ्यांनी डी.डी.ची रक्कम भरुन प्रवेश घेतला. मात्र त्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण न देता त्याची फसवणूक केली. विद्यार्थ्यांनी गडचांदूर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. यामध्ये जवळपास १५० ते २०० विद्यार्थ्यांचे डी.डी. असल्याची माहिती पुढे आली आहे. (वार्ताहर)