शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, अत्यसंस्काराला जातोय, बसू द्या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 05:00 IST

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी राज्यशासनाने लॉकडाऊन सुरू केले आहे. जिल्ह्याबाहेरील बससेवा बंद केली आहे. जिल्ह्यातील जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेत असणाऱ्यांना बससेवेने प्रवास करता येणार आहे. तसेच ज्या नागरिकांना बससेवेने प्रवास करायचे आहे त्यांना अत्यावश्यक सेवेचा पास जिल्हा प्रशासनाकडून काढणे गरजेचे आहे. असे असतानाही अनेकजण नानाविध कारणे पुढे करून एसटीने प्रवास करीत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देप्रवासासाठी दिली जातात नानाविध कारणे

लाेकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लॉकडाऊनमुळे एसटी आगाराने बससेवा बंद केली आहे. केवळ जिल्ह्यातच अत्यावश्यक सेवेसाठी बस धावत आहे. असे असतानाही काही प्रवासी अत्यसंस्काराला जातोय, दवाखान्यात जातोय अशी कारणे देऊन प्रवास करीत आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी राज्यशासनाने लॉकडाऊन सुरू केले आहे. जिल्ह्याबाहेरील बससेवा बंद केली आहे. जिल्ह्यातील जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेत असणाऱ्यांना बससेवेने प्रवास करता येणार आहे. तसेच ज्या नागरिकांना बससेवेने प्रवास करायचे आहे त्यांना अत्यावश्यक सेवेचा पास जिल्हा प्रशासनाकडून काढणे गरजेचे आहे. असे असतानाही अनेकजण नानाविध कारणे पुढे करून एसटीने प्रवास करीत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये विशेषत: एखाद्या ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या बससाठी तब्येत बरी नसल्याने दवाखान्यात जातोय, कधी जवळच्या नातेवाईकाला रुग्णालयात भेटायला जातो. तर कधी अंत्यसंस्काराला जातोय, अशी कारणे पुढे करून बसने प्रवास करतात. ही कारणे ऐकल्यावर बसचालकही बिनादिक्कत बसमध्ये प्रवेश देतो. काही वाहक प्रवाशांकडून पास मागत असल्याने वाहक व प्रवाशांमध्ये वाद होत असल्याचेही चित्र आहे. 

वरोरा-चंद्रपूर मार्गावर गर्दीसद्यस्थितीत आगारातून मोजक्या बस सोडण्यात येत आहेत. त्यापैकी वरोरा-चंद्रपूर मार्गावर काही प्रमाणात प्रवासी आढळून येतात. याउलट इतर बसमध्ये अत्यल्प प्रवासी प्रवास करीत आहेत. बहुतांश प्रवाशांकडे अत्यावश्यक सेवेतील पासून दिसून येतो.  

- सध्या संचारबंदीत अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी आहे. - प्रवाशांचे ओळखपत्र पाहून बसमध्ये प्रवास दिला जातो. ओळखपत्र नसेल तर प्रवास करू दिला जात नाही. - मात्र ज्यांच्याकडे प्रवासासंदर्भातील कुठलाही पास नाही त्या प्रवाशाला प्रवासास परवानगी मिळत नसल्याने वाहक व त्या प्रवाशात वाद होत आहे. 

प्रवाशांकडून तीच ती कारणे- लॉकडाऊन सुरू झाल्याने नियमित प्रवास करणाऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. - मात्र अनेकजण विविध कारणे पुढे करुन प्रवास करीत आहे. त्यामध्ये विशेषत: नातेवाईकांचा मृत्यू झाल्याने अंत्यसंस्कारासाठी जात आहेत. - जवळचा नातेवाइक भरती असल्याने रुग्णालयात त्याला भेटण्यासाठी जात आहे. तब्येत बरी नसल्याने डॉक्टरांना दाखवायला जात आहे, अशी कारणे सांगून प्रवास करीत आहेत. 

 

टॅग्स :state transportएसटीcorona virusकोरोना वायरस बातम्या