शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

२३३ गावांत सिंगल फेज योजना

By admin | Updated: June 25, 2014 00:24 IST

मागील काही वर्षात महावितरणने पायाभूत आराखडा, गावठाण फिडर सेपरेशन, पुनर्रचित गतिमान विद्युत विकास कार्यक्रम असे उपक्रम राबवून वीज क्षेत्रात सुधारणा घडवून आणली.

चंद्रपूर : मागील काही वर्षात महावितरणने पायाभूत आराखडा, गावठाण फिडर सेपरेशन, पुनर्रचित गतिमान विद्युत विकास कार्यक्रम असे उपक्रम राबवून वीज क्षेत्रात सुधारणा घडवून आणली. महावितरणने घेतलेल्या दोन महत्वांच्या निर्णयामुळे आता सिंगलफेज आणि कृषीधारकांना लाभ होणार आहे.जिल्ह्यातील २३३ गावांचा सिंगल फेजिंग योजनेत महावितरणने समावेश केला आहे. या सर्वच गावांना वीजवाहिन्याद्वारे विद्युतपुरवठा केला जाणार आहे. पूर्वीप्रमाणे सिंगल फेजवर उपलब्ध होणारी तीन फेज वीज आता दुपारी आठ तास व रात्री दहा तासांऐवजी इतर घरगुती वीजवाहिन्याप्रमाणे होणार आहे. सिंगल फेज व कृषी फिडर्सना याचा लाभ होणार आहे. मात्र, वीज वाणिज्यिक व वितरण हानीचा निकष येथेही लागू होणार आहे. अ, ब, क, व ड गटातील वीज वितरण हानीप्रमाणे कमी असायला हवी अन्यथा येथेही भारनियमन हे जादा वीज वितरण आणि वाणिज्यिक हानीच्या इ, फ, व ग गटाप्रमाणे होणार आहे.यापूर्वी इ, फ व ग गटातील वाहिनीवरील एखाद्या रोहित्रात बिघाड उत्पन्न झाल्यास त्या रोहित्रावरील ८० टक्के वीजबिलांचा भरणा झाल्याशिवाय ते रोहित बदलून देण्यात येत नव्हते. मात्र, ही अट आता शिथिल करण्यात आली असून, शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे.महावितरणने घेतलेल्या या निर्णयास सकारात्मक प्रतिसाद देण्यासाठी कृषी व घरगुती ग्राहकांना वेळेवर वीजबिलांचा भरणा करावा लागणार आहे. दरम्यान जिल्ह्यातील मागील अनेक वर्षापासून डिमांड भरुनही कृषी पंपाना वीज दिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विहीरी केवळ शोभेच्या वास्तू झाल्या होत्या. मात्र या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल, अशी शक्यता आहे. (नगर प्रतिनिधी)