शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ‘सिंघम’ अवतरणार त्वरीत पोलीस मदत मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 05:00 IST

दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर केंद्र पातळीवर एक हेल्पलाईन स्थापित करण्याची मागणी होत होती. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार आपत्कालीन प्रतिसाद साहाय्य प्रणाली (ईआरएसएस) निर्मितीचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कोणत्याही व्यक्तीला आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्काळ मदत हवी असल्यास ११२ नंबरची हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात आली. यासंदर्भातील सर्व प्रणाली पोलीस कंट्रोल रूममध्ये जोडण्यात आली आहे.

ठळक मुद्देनवी हेल्पलाईन ठरणार वरदान : पोलिसांच्या दिमतीला नवी वाहने

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आपत्कालीन परिस्थितीत गरजूंना तत्काळ मदत देता यावी, या उद्देशाने ११२ नंबरची हेल्पलाईन राज्यभरासह चंद्रपूर जिल्ह्यातही कार्यान्वित करण्यात आली आहे. चंद्रपूर पोलीस कंट्रोल रूममध्ये या संदर्भातील प्रणाली जोडण्यात आली आहे. या हेल्पलाईनवर आपत्कालीन परिस्थितीतील अडकलेल्या व्यक्तीचा कॉल येताच त्याचे जीपीएस लोकेशन त्वरित कळणार असल्याने पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी वेळीच  घटनास्थळी पोहोचूून मदत करणार आहेत. सर्व वाहने मिळाल्यानंतर व तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर दहा मिनिटात संबंधित पथक पोहणार आहे. ही हेल्पलाईन वरदान ठरणार आहे. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर केंद्र पातळीवर एक हेल्पलाईन स्थापित करण्याची मागणी होत होती. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार आपत्कालीन प्रतिसाद साहाय्य प्रणाली (ईआरएसएस) निर्मितीचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कोणत्याही व्यक्तीला आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्काळ मदत हवी असल्यास ११२ नंबरची हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात आली. यासंदर्भातील सर्व प्रणाली पोलीस कंट्रोल रूममध्ये जोडण्यात आली आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत असलेल्या व्यक्तीने फोन लावल्यावर अवघ्या काही सेकंदात हा फोन कुठून आला, हे कळणार आहे. त्यानंतर तेथील पोलीस नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल, महिला हेल्पलाईन, चाईल्ड हेल्पलाईन यांना एकाच वेळी सदर कॉलची माहिती दिली जाणार आहे. त्यानुसार घटनेचे गंभीर्य लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल होऊन आपत्कालीन परिस्थितीत असलेल्या व्यक्तीला मदत करू शकतील.जिल्ह्यात एकूण ३२ पोलीस ठाणे आहेत. त्यात १९४ पोलीस अधिकारी व २५०० कार्यरत आहेत. यापैकी ४७० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांच्या दिमतीला जिल्हा नियोजनाच्या विकास निधीतून १५ अद्यावत वाहने देण्यात आली आहेत. यासोबत निधी आल्यानंतर पुन्हा काही चारचाकी व दुकाही वाहने खरेदी करण्यात येणार आहेत. ही वाहने प्रत्येक तालुका मुख्यालयी राहणार असून ११२ नंबरवर कॉल येताच वेळीच घटनास्थळ गाठून मदत करणार आहेत. त्यामुळे ही हेल्पलाईन वरदान ठरणार आहे. 

कॉल येताच कळणार लोकेशनआपत्तीमध्ये मदत मागणाऱ्याने ११२ वर कॉल केल्यावर तो कॉल राज्यातील कॉल सेंटरला जाईल. त्यानंतर तेथून संबंधित जिल्ह्यातील म्हणजे महसूल, पोलीस फायद ब्रिगेड आदींशी संबंधित असल्यास पोलीस विभागाकडून त्या परिसरातील बिट मार्शलकडे जाईल. नंतर कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्यावर जीपीएसवर नोंद होईल आणि तक्रारीचे निवारण करण्यात येईल.  

५० चारचाकी, ८२ दुचाकीची मागणी आपत्तीमध्ये सापडलेल्यांपर्यंत तातडीने पोहोचता यावे, यासाठी ५० चारचाकी वाहने व ८२ दुचाकी वाहनाची मागणी करण्यात आली आहे. त्यापैकी जिल्हा नियोजनाच्या विकास निधीतून १५ व इतर ५ असे एकूण २० अद्यावत वाहने मागील काही दिवसांपूर्वी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत पोलीस विभागाकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे निधीची तरतूद झाल्यानंतर पुन्हा आणखी काही वाहने तसेच दुचाकी खरेदी करण्यात येण्याची माहिती आहे. 

४७० पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण‘सेंट्रलाईज कंट्रोल रूम’ला फोन आल्यावर कसा प्रतिसाद द्यायचा, कंटोल रूमला फोन आल्यावर काय प्रक्रिया करायची, आपत्तीमध्ये कशी मदत करायची याबाबत जिल्ह्यातील ४७० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.  

आपत्कालिन परिस्थितीमध्ये अडकलेल्यांना पोलिसांची मदत घेता यावी, यासाठी ११२ क्रमांकाची हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. याबाबतची प्रणाली पोलीस कंट्रोल रुमला जोडण्यात आली आहे. हेल्पलाईनवर तक्रार आल्यानंतर तत्काळ दखल घेतली जाणार आहे. या प्रणालीमुळे नागरिकांना तक्रारींना जलद प्रतिसाद देता येईल, आणि लोकाभिमुख काम करण्यास पोलिसांना मदत होईल.-अरविंद साळवे, जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रपूर

पोलिसांची मदत हवी असल्यास ११२ डायल कराजिल्ह्यातील कुठल्याही गावातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ पोलिसांची मदत हवी असल्यास त्यांनी ११२ नंबर डायल करायचा आहे. त्यापुढच्या अवघ्या १० मिनिटांमध्ये पोलीस मदतीला धावून येतील, असे नियोजन करण्यात येत आहे. नवा हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्याची प्रक्रिया जवळपास लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. लवकरच ही सुविधा जिल्हाभरात पुरविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळाली. 

 

टॅग्स :Policeपोलिस