शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

सिंदेवाहीची निवडणूक अखेर रद्द

By admin | Updated: December 9, 2015 01:22 IST

महाराष्ट्र शासनाने तालुका मुख्यालय असलेल्या सर्व गावांमध्ये नगरपंचायत गठित केली आहे. याला मात्र सिंदेवाही तालुका मुख्यालय अपवाद राहिले.

संघर्ष समितीला यश : सर्वच उमेदवारांची माघारसिंदेवाही : महाराष्ट्र शासनाने तालुका मुख्यालय असलेल्या सर्व गावांमध्ये नगरपंचायत गठित केली आहे. याला मात्र सिंदेवाही तालुका मुख्यालय अपवाद राहिले. ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला होता. मात्र या निवडणूक प्रक्रियेवर नागरिकांनी बहिष्कार टाकला. त्या चार जणांनी नामांकन दाखल केले होते, त्यांनीही ते परत घेतल्याने ही निवडणूक प्रशासनाला अखेर रद्द करावी लागली आहे.सिंदेवाही ग्रामपंचायत निवडणुकीच्या नामांकन भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वपक्षीय नेत्यांनी तातडीची बैठक घेऊन संघर्ष समिती स्थापन केली व निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. मात्र यापूर्वीच चार उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले होते. त्यामुळे हे चारही उमेदवार ग्रा.पं. निवडणुकीचे अर्ज मागे घेणार की नाही, याबाबत शंका होती. मात्र नामांकन परत घेण्याच्या आज शेवटच्या दिवशी चारपैकी एक अर्ज छानणीमध्ये रद्द झाला तर तिघांनी सर्वासमोर गावाच्या विकासासाठी अर्ज मागे घेऊन सिंदेवाही ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार केला. सिंदेवाही नगरपंचायतीसाठी तालुका संघर्ष समितीच्या वतीने वॉर्डावॉर्डात जनजागृती करण्यात आली. त्यामुळे भाजपा, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षातील ज्येष्ठ पदाधिकारी व सदस्यांनी एकत्रीत येवून गावांच्या विकासासाठी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. आम्हाला ग्रामपंचायत नको, नगरपंनचायत हवी, असा संदेश बहिष्काराच्या माध्यमातून शासनाला दिला. तालुका संघर्ष समितीने हे सर्व होवून शासन जागे न झाल्यास शासनाच्या विरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा मानस व्यक्त केला आहे. सिंदेवाही तालुक्याला हेतूपुरस्सर नगरपंचायतीच्या यादीतून डावलले जात असल्याचेही समितीने म्हटले आहे. त्यामुळे याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिंदेवाहीकरांनी अखेर निवडणुकीवरच बहिष्कार टाकला. आता यामुळे प्रशासनालाही निवडणूक रद्द करावी लागणार आहे.सिंदेवाही ग्रामपंचायत निवडणूक रद्द करण्यास सिंदेवाहीच्या नागरिकांनी तसेच राजकीय पक्षातील पदाधिकारी, सदस्य, व्यापारी मंडळ, तालुका संघर्ष समिती सदस्य, पत्रकारबंधू यांनी सहकार्य केले आहे. (शहर प्रतिनिधी)