शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यपूर्व काळापासून 'ती' गावे पक्क्या रस्त्याविना; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 14:33 IST

गंगासागर हेटी-लोहारडोंगरी : खडतर वाटेत वन्यप्राण्यांचीही भीती

लोकमत न्यूज नेटवर्क सावरगाव : नागभीड तालुक्यातील जंगलव्याप्त भागात असलेल्या गंगासागर हेटी-लोहारडोंगरी गावाला स्वातंत्र्यपूर्व काळापासून पक्का रस्ताच नाही. परिणामी, नागरिक तळोधी (बा) महामार्गाचा वापर करतात. परंतु, या रस्त्याची अवस्था दयनीय आणि बिकट झाली आहे. तसेच हिंस्त्र पशुंचा नेहमीच वावर राहतो. त्यामुळे या रस्त्याने मार्गक्रमण करणे धोक्याचे झाले आहे. मात्र, याकडे बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. 

लोहारडोंगरी हे छोटेशे आदिवासीबहुल खेडेगाव आहे. या गावाच्या आसपास किटाळी, नवेगाव हे खेडेगाव आहेत. येथील नागरिक मोलमजुरी करून पोटाचा उदरनिर्वाह करतात. येथील लोकांना तळोधी बाजारपेठ अगदी जवळ पडत असल्याने त्यांना लोहारडोंगरी- गंगासागर हेटी या एकमेव मार्गाने यावे लागते. येथील मुले प्राथमिक शिक्षणासाठी गंगासागर हेटी तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी गंगासागर हेटी, वाढोणा, तळोधी येथे जातात. परंतु, हा मार्ग कमकुवत व कच्च्या रस्त्याचा आहे. तसेच वाघ व इतर हिस्त्र प्राण्यांची दहशत असते. त्यामुळे या रस्त्याने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

झाडे-झुडपांनी वेढला रस्तालोहारडोंगरी - गंगासागर हेटी गावाच्या या रस्त्यावर दुतर्फा झाडे- झुडपे वाढली आहे. तसेच रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.साधे दुचाकीवरून प्रवास करणे कठीण झाले आहे. जंगलालगत रस्त्यावर हिंस्त्र श्वापदांचा वावर आहे. त्यामुळे बरेचदा दुर्घटना घडल्या असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

रस्ता एकच, गावे वेगवेगळ्या क्षेत्रात गंगासागर हेटी-लोहारडोंगरी हा रस्ता जवळपास चार किमी अंतराचा आहे. मात्र लोहारडोंगरी, किटाळी, नवेगाव ही गावे ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात येतात. तर गंगासागर हेटी हे गाव चिमूर विधानसभा क्षेत्रात येते. वास्तविक पाहता ब्रह्मपुरी क्षेत्रातील मार्ग डांबरीकरणाचा झाला आहे. मात्र, काही अंतराचा मार्ग अत्यंत दयनीय स्थितीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

"गंगासागर हेटी-लोहारडोंगरी रस्त्याची दैनावस्था झाली आहे. या जंगलव्याप्त गावाच्या रस्त्याचे मजबुतीकरण करण्यासाठी अनेकदा प्रयत्न करूनही लोकप्रतिनिधींकडून डोळेझाक होत आहे. रस्त्याच्या या गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन तत्काळ हा प्रश्न निकाली काढावा." - वासुदेव गायकवाड, माजी सरपंच ग्रा. पं. गंगासागर हेटी

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाchandrapur-acचंद्रपूर