शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

वरोरा व चंद्रपूर हाॅटस्पॉट ठरण्याचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:25 IST

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २४ हजार ११६ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २३ हजार ...

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २४ हजार ११६ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २३ हजार १२८ झाली आहे. सध्या ५८८ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत २ लाख २१ हजार ६३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी १ लाख ९४ हजार ७२६ नमुने निगेटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत ४०० बाधितांचे मृत्यू झाले असून, यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३६२, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १८, यवतमाळ १६, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

शनिवारी बाधित आलेल्या १२० रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील २८, चंद्रपूर तालुक्यातील दोन, बल्लारपूर सात, भद्रावती पाच, ब्रह्मपुरी तीन, नागभीड एक, सिंदेवाही तीन, मुल दोन, राजुरा सहा, वरोरा ६२ व कोरपना येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

कोरोनाचे रुग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यांतून आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करून सुरक्षित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

वरोऱ्यात तीन दिवसांत १५३ रुग्ण

वरोरा तालुक्यात १ मार्च रोजी केवळ १ रुग्ण आढळला. २ मार्च रोजी ४ रुग्ण आढळले. ३ मार्च रोजी एकही रुग्ण आढळला नव्हता. यानंतर ४ मार्च रोजी अचानक २६ रुग्ण आढळले. यानंतर हा आकडा दुप्पटीपेक्षा अधिक म्हणजे ५ मार्च रोजी ५९ वर गेला. ६ मार्च रोजी पुन्हा ६३ रुग्ण आढळले. अचानक वाढत असलेल्या या रुग्णसंख्येमु‌ळे वरोरा तालुका कोराेनाच्या बाबतीत संवेदनशील होत असल्याचे दिसून येत आहे.

चंद्रपूर मनपा क्षेत्रात सहा दिवसांत १४१ रुग्णांची भर

वरोरा तालुक्याच्या पाठोपाठ चंद्रपूर महानगरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. १ मार्च रोजी ९, २ मार्च २९, ३ मार्च २३, ४ मार्च २०, ५ मार्च ३२, ६ मार्च रोजी २८ नव्या रुग्णांची भर पडली आहे. म्हणजे सहा दिवसांत १४१ रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यातील आढळत असलेल्या नव्या रुग्णांच्या संख्येवर तालुकानिहाय दृष्टी फिरवल्यास सर्वाधिक रुग्ण वरोरा तालुक्यात तर यापाठोपाठ चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्राचा क्रमांक लागतो.

कोरोना कहर करण्याचे संकेत

चंद्रपूर जिल्ह्यात पहिली कोरोनाची लाट उशिराने आली होती. आता दुसरी लाटही उशिराने येत असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते. चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर कोरोनाचा कहर सुरू आहे. आता चंद्रपूर जिल्ह्याचीही या दिशेने वाटचाल सुरू झाल्याचे हे संकेत होऊ शकते.