शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

श्रीसाईबाबा संस्थेकडून शासकीय रुग्णालयाला ७.५ कोटींची देणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 23:28 IST

शिर्डी येथील प्रसिद्ध श्री साईबाबा संस्था विश्वस्त मंडळाच्या वतीने चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास साडेसात कोटींची देगणी देण्यात आली. शिर्डी संस्थेने ही रक्कम शासनाकडे जमा केली असून वैद्यकीय शिक्षण विभागाने बुधवारी मंजुरी प्रदान केली.

ठळक मुद्देएमआरआय मशीन खरेदी करणार : रुग्णांसाठी समस्या होणार दूर

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शिर्डी येथील प्रसिद्ध श्री साईबाबा संस्था विश्वस्त मंडळाच्या वतीने चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास साडेसात कोटींची देगणी देण्यात आली. शिर्डी संस्थेने ही रक्कम शासनाकडे जमा केली असून वैद्यकीय शिक्षण विभागाने बुधवारी मंजुरी प्रदान केली. या निधीतून एमआरआय (१.५ टेस्ला) मशिन खरेदी करण्यात येणार आहे. एमआरआय या अत्याधुनिक आरोग्य सुविधांपासून वंचित असलेल्या रुग्णांसाठी ही मशिन संजिवनी ठरणार आहे.देशाच्या धार्मिक क्षेत्रात शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिरांची मोठी कीर्ती आहे. मंदिराचे दर्शन घेण्यासाठी देशभरातील लाखो भाविक येतात. त्यामुळे दानधर्माच्या माध्यमातून संस्थेच्या उत्पन्नात दरवर्षी वाढ होत आहे. भाविकांना सर्व सोयीसुविधा स्वस्त दरात पुरविले जातात. शिवाय देशातील विविध जिल्ह्यांमध्ये समाजसेवेचे कार्य सुरू आहे. सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात येणाºया लोकोपयोगी उपक्रमांमुळे संस्थेची प्रतिमा उंचावली. धार्मिक क्षेत्रात प्रतिष्ठा मिळविणाºया या संस्थेने चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास तब्बल साडेसात कोटी रुपयांची देणगी देण्याचा निर्णय घेतला होता. लगेच अंमलबजावणीही केली. ही रक्कम राज्यशासनाकडे जमा करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने या निधीतून एमआरआय मशिन (१.५ टेस्ला) घेण्याचा प्रस्ताव तयार केला होता. यंत्रसामुग्री तातडीने खरेदी करण्यासाठी बुधवारी प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यामुळे गरिबांच्या उपचारासाठी मोठी मदत होणार आहे.हाफकिन बायो इन्स्टिट्युटच्या मार्गदर्शनात यंत्र खरेदीशासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमआरआय मशिन खरेदी करण्यासाठी उद्योग विभागाने कार्यपद्धती तयार केली आहे. यंत्रासामुग्री हाताळण्यासाठी पदनिर्मिती केली जाणार नाही. यंत्रसामुग्री खरेदी करण्याची जबाबदारी हाफकिन कंपनीला देण्यात आली. ही प्रक्रिया लवकरच होणार असल्याचे आदेशात नमूद केले आहे.अडचणी कायमचंद्रपुरातील शासकीय रुग्णालयात पुरेशी अत्याधुनिक यंत्र सामग्री उपलब्ध नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना संकटांचा सामना करावा लागतो. शिवाय, विविध विभागात रिक्त पदांचा अनुशेष कायम आहे. शासकीय वैद्यकीय वैद्यकीय सुरू झाल्यानंतर नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या.पण, अडचणी कायम आहेत.