शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

संपामुळे दोन दिवसांत एक कोटींचा फटका

By admin | Updated: July 28, 2016 01:27 IST

शेतमाल विक्रीतील अडत थेट व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याच्या निर्णयाच्या विरोधात चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडते व व्यापाऱ्यांनी....

अडते-व्यापाऱ्यांचा संप : शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या चंद्रपूर : शेतमाल विक्रीतील अडत थेट व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याच्या निर्णयाच्या विरोधात चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडते व व्यापाऱ्यांनी मंगळवारपासून संप सुरू केला आहे. हा संप बुधवारीही सुरू होता. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची मोठी गोची झाली असून माल विकायचा कुठे, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. दरम्यान संपामुळे दोन दिवसांत जवळपास १ कोटी रूपयाची उलढाल थांबल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली. संपामुळे चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीसह गंज वॉर्डातील भाजी बाजारात शुकशुकाट पसरला आहे. त्यामुळे ग्राहकांचीही मोठी पंचाईत झाली आहे. भाजीपाल्याचे दर दुप्पटीने वधारले असून ठोक भावात माल विकणारे शेतकरी चिल्लर विक्री करण्यास नकार देत आहेत. परिणामी भाजीपाल्याची नियमीत विक्री करणारे चिल्लर भाजीविक्रेते गल्लोगल्ली फिरून दामदुप्पट दराने भाजीपाल्याची विक्री करीत आहेत. व्यापाऱ्यांकडून अडत कापण्याच्या निर्णयाविरोधात राज्यभरात आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनीही संप सुरू केला आहे. या संपात बाजार समितीचे ६९ भाजीपाला अडते व फळांचे ३४ अडते असे १०३ तर १२७ व्यापाऱ्यांचा समावेश आहे. सायंकाळी व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली. मात्र तोडगा निघू शकला नाही. (स्थानिक प्रतिनिधी) भाजीपाल्याचे भाव दुप्पट व्यापाऱ्यांच्या संपामुळे शेतकऱ्यांच्या मालाची ठोक विक्री थांबली आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव दुप्पट वाढले असून दोन दिवसांपुर्वी टमाटर ३० रूपये किलो होते. संपामुळे हातठेलेवाले टमाटर ५० रूपये किलो, मिरची १०० रूपये, पत्ता कोबी ६० रूपये, कारली १२० रूपये, ढेमसे ६० रूपये, वांगे ८० रूपये, बटाटे ५० रूपये, कोहळा ५० रूपये किलो दराने विकला जात आहे. त्यामुळे गृहीणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.