शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

चिमुरमधील वनडेपोत जळाऊ लाकडांचा तुटवडा

By admin | Updated: March 23, 2017 00:37 IST

येथे वनविभागाचे लाकूड साठवणूक डेपो असून नागरिकांसाठी जळाऊ लाकडे, बांबू ठेवले जाते.

वनमंत्र्यांकडे तक्रार : अंत्यसंस्कारासाठीही लाकडे नाहीतचिमूर : येथे वनविभागाचे लाकूड साठवणूक डेपो असून नागरिकांसाठी जळाऊ लाकडे, बांबू ठेवले जाते. परंतु मागील महिन्यापासून येथे लाकडं ठेवली जात नसल्यामुळे नागरिकांना फार मोठी अडचण निर्माण होत आहे.वनविभागाचे अधिकारी मात्र याकडे डोळेझाक करीत आहेत. अंत्यसंस्कारासाठीही लाकडे नसणे ही शोकांतिका आहे. वनविभागाने तात्काळ दखल घेत वनडेपोत लाकडांचा साठा ठेवण्याची मागणी हिंदू क्रांतिसेनेचे जिल्हा अध्यक्ष तथा नगरपालिकेचे बांधकाम सभापती नितीन कटारे यांनी केली असून संबंधित वन अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.चिमूर नगरपरिषद क्षेत्रात वनविभागाच्या कार्यालयात डेपो असून या डेपोत मयताच्या अंत्यसंस्कारासाठी लाकडं, बांबू ठेवणे गरजेचे आहे. कारण हिंदू धर्मातील मय्यत व्यक्तीचे दहन केले जाते. त्यासाठी लाकडांची गरज भासते. मात्र, वनविभागाचे अधिकारी या समस्येकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे मृताच्या आप्तेष्टांची मोठी गैरसोय होते. २० मार्च रोजी अंत्यसंस्कारासाठी लाकडे घेण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी लाकडाचा तुटवडा दिसला. यावेळी कटारे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मागील दोन महिन्यांपासून लाकडांची मागणी असताना ती पुरविली का जात नाही, उलट खडसंगीला जा असे सांगीतले जाते. चिमूर वनडेपोत लाकडे उपलब्ध करून का दिली जात नाहीत, याला कोण जबाबदार, असे प्रश्न निर्माण होत असून या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यासाठी वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व आ. कीर्तिकुमार भांगडिया यांच्याकडे तक्रार करून पाठपुरावा करणार असल्याची माहिती देत डेपोत लाकडांचा साठा उपलब्ध करण्याची मागणी हिंदू क्रांती सेनेचे जिल्हा अध्यक्ष तथा सभापती नितीन कटारे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)