शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दुकानदारांच्या वजनात घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 21:56 IST

आधीच महागाई गगनाला भिडत आहे. सर्वसामान्य नागरिक या महागाईमुळे भरडले जात आहेत. असे असतानाच आता दुकानदारांकडून ग्राहकांची लूट केली जात आहे. वजनात घोळ केली जात असून अनेक ठिकाणी वजनाच्या नावाखाली दगड, लोखंडाचा वापर केला जात असल्याचे लोकमतच्या पाहणीत आढळून आले. मात्र पॅकिंगमध्ये असलेले खाद्य पदार्थ व इतर वस्तू एमआरपी दरानेच विकले जात असल्याचेही लोकमतच्या पाहणीत आढळून आले.

ठळक मुद्देग्राहकांची लूट : पॅकिंग वस्तू मात्र एमआरपी दरानेच

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आधीच महागाई गगनाला भिडत आहे. सर्वसामान्य नागरिक या महागाईमुळे भरडले जात आहेत. असे असतानाच आता दुकानदारांकडून ग्राहकांची लूट केली जात आहे. वजनात घोळ केली जात असून अनेक ठिकाणी वजनाच्या नावाखाली दगड, लोखंडाचा वापर केला जात असल्याचे लोकमतच्या पाहणीत आढळून आले. मात्र पॅकिंगमध्ये असलेले खाद्य पदार्थ व इतर वस्तू एमआरपी दरानेच विकले जात असल्याचेही लोकमतच्या पाहणीत आढळून आले.चंद्रपुरात एमआरपीपेक्षा जास्त दराने अनेक खाद्य पदार्थ, वस्तू यांची विक्री होते का, याबाबत लोकमतने शनिवारी बाजारपेठेत जाऊन पाहणी केली. विविध दुकानात जाऊन पॅकींगमध्ये असलेले खाद्य पदार्थ व साबणाची खरेदी केली. यावेळी दुकानदारांनी एमआरपी किंमतच घेतली.मात्र बाजारपेठेत फिरताना आणखी एक धक्कादायक प्रकार लक्षात आला. तांदूळ, साखर, गहू व इतर किराणा वस्तू मोजून देताना काही दुकानात इलेक्ट्रानिक तराजूचा वापर होताना दिसला. तर काही ठिकाणी वजनमापे ठेवलेल्या साध्या तराजूचा वापर होत असल्याचेही दिसून आले.विशेष म्हणजे, अनेक दुकानातील वजनांचे पासींगच केले नसल्याचे आढळून आले. अनेक दुकानात वर्षानुवर्षापासून तेच ते एक किलो, दोन किलो, पाच किलो, दहा किलोचे वजन वापरले जात आहे. बदाम, काजू, खसखस यासारख्या महागड्या वस्तू ग्रॅमनेच खरेदी केल्या जातात. मात्र काही ठिकाणी ग्रॅमच्या वजनाऐवजी एक रुपया, पाच रुपयांची नाणी वापरली जात आहे. काही दुकानात तर केवळ लोखंडच तराजूमध्ये ठेवले जाते व त्यानेच मोजून वस्तू दिली जाते.भाजी विक्रेत्यांकडूनही लूटप्रस्तुत प्रतिनिधीने भाजीमार्केटमध्ये फेरफटका मारला असता या ठिकाणी तर अंदाजानेच भाजीपाला विकला जात असल्याचे दिसून आले. काही भाजीविक्रेते भाजीपाला मोजून देतात. मात्र अनेकांकडे अधिकृत वजनाऐवजी दगड, लोखंड यांचा वापर केला जात असल्याचे दिसून आले.एका ठिकाणी ३० रुपये किलो याप्रमाणे टमाटर असेल तर तेच टमाटर काही फुटांवर असलेल्या दुसऱ्या भाजीविक्रेत्यांकडे २० रुपये प्रमाणे विकले जाते. तेथीलच भाजीविक्रेत्याला याबाबत विचारले असता वजनात घोळ करून कमी किमतीत टमाटर विकले जात असल्याचे सांगितमले.वजनांची पासिंग नाहीदरवर्षी दुकानदारांकडे असलेल्या वजनांची पासींग होणे अपेक्षित आहे. मात्र संबंधित विभागाकडून दुकानदारांकडील वजनाची पासींगच केली जात नाही. वर्षानुवर्ष एकच वजन दुकानदार वापरत असल्याचे दिसते. त्यामुळे ग्राहक भरडला जात आहे.दरात मोठी तफावततांदूळ, दाळ, गहू, साखर व इतर वस्तूंच्या दराविषयी काही दुकानात माहिती घेतली असता त्यात मोठी तफावत दिसून आली. प्रत्येक वस्तूची किंमत विविध दुकानांमध्ये वेगवेगळी असल्याचे दिसून आले. याबाबत एका किराणा दुकानदाराला विचारले असता त्याने वस्तूच्या क्वालिटीमुळे ही तफावत असल्याचे सांगितले. मात्र वजनातही घोळ असण्याची शक्यता यात आहे.