शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूर येथील जुन्या बसस्थानक परिसरात नकाबधारी युवकांनी गोळ्या झाडून केली इसमाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 16:35 IST

बल्लारपूर शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात शनिवारी दुपारी २ च्या सुमारास सूरज बहुरीया या इसमावर दोन दुचाकीने आलेल्या दोन युवकांनी गोळीबार केला.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बल्लारपूर येथील जुन्या बसस्थानक परिसरात एका दुचाकीने आलेल्या दोन नकाबधारी अज्ञात युवकांनी जवळ असलेल्या पिस्तूलातून येथीलच सूरज बहुरीया यांच्यावर गोळीबार केला. ही थरारक घटना शनिवारी दुपारी 2.34 वाजताच्या सुमारास घडली. नकाबधारी युवकांनी पिस्तूलातून एकूण सहा गोळ्या झाडल्या. त्यातील तीन गोळ्या सूरज बहुरीया यांना लागल्या. घटनेनंतर लगेच त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याचे पाहून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चंद्रपूरला हलविले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. आरोपी ज्या दिशेने पळाले. त्या मागावर पोलीस शोध घेत आहे.  या घटनेने बल्लारपुरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची वार्ता बहुरीया यांच्या समर्थकांपर्यंत पोहचताच ते चांगलेच बिथरले असल्याचे समजते. बहुरीया परिवार बल्लारपूर वेकोलिच्या काटागेटजवळ राहतात. या भागात तणावाची स्थिती आहे.प्राप्त माहितीनुसार, सूरज बहुरीया हे बामणीहुन बल्लारपुरात कारने परत येत होते. अश्यातच जुन्या बसस्थानक परिसरात भेंडे नाल्याच्याजवळ अचानकपणे दोन नकाबधारी युवक दुचाकीने येऊन बहुरीया यांची कार अडवली. त्यांनी बहुरीया यांना कारच्या काचा खाली उतरवायला सांगितल्या. बहुरीया यांनी त्यांचे ऐकले नाही. अशातच त्या युवकांनी बहुरीया यांच्या दिशेने कारच्या काचावर बेछूट गोळीबार केला. यातील तीन गोळ्या बहुरीया यांच्या शरीरात घुसल्या. सूरज बहुरीया यांचा रविवारी वाढदिवस होता. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी शहरात फलक लावले होते.

 

 

टॅग्स :Firingगोळीबार