शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नऊ बीडीओंना ‘शोकॉज’

By admin | Updated: June 14, 2016 00:28 IST

वरिष्ठांना कोणतीही पूर्वसूचना न देता मुख्यालयी गैरहजर राहिल्याच्या कारणावरून जिल्ह्यातील नऊ गटविकास ....

नव्या सीईओंचा दणका : विनापरवानगीने मुख्यालयी गैरहजर चंद्रपूर : वरिष्ठांना कोणतीही पूर्वसूचना न देता मुख्यालयी गैरहजर राहिल्याच्या कारणावरून जिल्ह्यातील नऊ गटविकास अधिकाऱ्यांना नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंग यांनी कारणे दाखवा नोटीस बजावले आहे. त्यांना तीन दिवसांत खुलासा मागितला असून सीईओंच्या या कार्यवाहीने जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे.नोटीस बजाविण्यात आलेल्यांमध्ये सिंदेवाही, राजूरा, पोंभुर्णा, नागभीड, बल्लारपूर, गोंडपिंपरी, चंद्रपूर, भद्रावती व मूल या नऊ पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांचा समावेश आहे. येथील जिल्हा परिषदेत आठ ते दहा दिवसांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून एम. देवेंदर सिंग रूजू झाले. रूजू होताच त्यांनी जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन स्वच्छ प्रशासन व कर्तव्यदक्षतेने काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. नियमानुसार काम करा, अन्यथा कार्यवाहीला समोर जा, असे त्यांनी बैठकीत अधिकारी, कर्मचाऱ्यांना बजावले होते. ११ जूनला मुख्य कार्यकारी अधिकारी सिंग यांनी विविध पंचायत समिती व अधिनिस्त प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देण्यासाठी गेले. मात्र या भेटीत सिंदेवाही, राजूरा, पोंभुर्णा, नागभीड, बल्लारपूर, गोंडपिंपरी, चंद्रपूर, भद्रावती व मूल अशा तब्बल नऊ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मुख्यालयी गैरहजर आढळून आले. मुख्यालय सोडत असताना वरिष्ठांना पूर्वसूचना देणे आवश्यक आहे. परंतु, नऊही पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती. याबाबत अधिक चौकशी केली असता, काही जण नागपूर, जबलपूर व इतर ठिकाणी गेल्याचे कळले. त्यामुळे वरिष्ठांना कोणतीही पूर्वसूचना न देता मुख्यालय सोडल्याच्या कारणावरून नवही गटविकास अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावले आहे. सर्वांना पुढील तीन दिवसांत नोटीसचे उत्तर मागितले असून या प्रकारामुळे जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)मुख्यालय सोडताना वरिष्ठांना सूचना देणे क्रमप्राप्त आहे. मात्र नवही गटविकास अधिकाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता मुख्यालय सोडले. त्यामुळे त्यांना नोटीस बजावून तीन दिवसांत लेखी खुलासा मागितला आहे. - एम. देवेंदर सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्रपूर.