चिमूर तालुका शिवसेनेच्या वतीने हुतात्मा स्मारक येथे शिवसेना कार्यकर्ता व मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व मार्गदर्शक शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मते हे होते. उपजिल्हाप्रमुख अमृत नखाते, ब्रम्हपुरी उपतालुकाप्रमुख केवळराम पारधी, वरोरा उपतालुकाप्रमुख लक्ष्मण ठेंगणे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान तालुक्यातील विद्या घुगुस्कर, ज्योती कोडापे, संगीता जीवतोडे, दिनेश संघेल, माया जांभूळे, ताराचंद राऊत, शैला पाटील, गोरखनाथ मेश्राम, नरेश मोहीनकर, योगेश मेश्राम, सुनील कुळसंगे, सरिता बघेल, नामदेव खोबरे आदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केला. प्रास्ताविक श्रीहरी सातपुते, सूत्रसंचालन रोशन जुमडे यांनी तर किशोर उकुंडे यांनी आभार मानले.