शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ कोंबडीच्या पिलाला घेते कुशीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 23:51 IST

कुत्रे आणि कोंबडी यांच्यामध्ये फार मोठे शत्रुत्व राहात नसले तरी त्यांचे एकमेकांशी खूप पटते.

ठळक मुद्देविजोड प्राण्यांचे ममत्त्व

वसंत खेडेकर।आॅनलाईन लोकमतबल्लारपूर : कुत्रे आणि कोंबडी यांच्यामध्ये फार मोठे शत्रुत्व राहात नसले तरी त्यांचे एकमेकांशी खूप पटते. एखाद्या कुत्रीने कोंबडीच्या पिल्ल्याला ममत्त्वाने आपल्या कुशीत घेवून त्याला पोटच्या गोळ्याप्रमाणे लाड करावे, एवढे सख्य तर त्यांचेत नक्कीच राहात नाही. परंतु एका कुत्रीचे कोंबडीच्या एका पिलावर जडलेले आईचे प्रेम शहरातील राजू शर्मा यांच्या शेतात बघायला मिळत आहे.राजू शर्मा यांची वर्धा नदी काठावर शेती आहे. तेथेच त्यांचा दूधाचा व्यवसाय आहे. तेथे कौलारू लहानसे घर असून आश्रयाला काही कुत्रीही राहतात. त्यातील एका कुत्रीने सहा दिवसांपूर्वी दोन पिलांना जन्म दिला. दोन दिवसानंतर एका कुत्र्याने त्यातील एका पिल्याला उचलून नेऊन त्याचा फडशा पाडला. त्यामुळे चवताळून कुत्रीने त्याचा पाठलाग करून तेथून हुसकावून लावले. परत येताना तिने कोंबडीचे पांढºया रंगाचे पिल्लू तोंडात धरून ती राहात असलेल्या ठिकाणी आणले. ते बघून ही कुत्री आता कोंबडीच्या त्या पिलाचा फडशा पाडणार, असे शर्मा यांना वाटले. मात्र, तसे काहीही घडले नाही.कुत्री आपल्या पिल्ल्यासोबत कोंबडीच्या पिलाला आपल्या कुशीत घेवून त्याला चाटतात. त्याचे लाड करतात, हे चित्र सहजपणे पाहायला मिळते. या घटनेला पाच दिवस झालेत. कोंबडीचे पिल्लू तिचे सोबतच राहत आहे. तिच्या अंगाखांद्यावर खेळत आहे. पिल्लू तिच्यापासून कदापि दूर जात नाही. थोडे दूर गेले की ती त्याचा लगेच सुगावा घेते. हे बघून कुणाचा कधी कुणावर जिव्हाळा बसेल, हे सांगणे अशक्य असल्याची प्रचिती या घटनेने आणून दिली आहे. कुत्रीला कोंबडीच्या पिलाचा एकाएकी एवढा लळा लागण्याचे कारण हे एक गुढ असल्याचे मानले जात आहे.हे तर जिव्हाळ्याचे शेतपिलाला जन्म देताच गाईने प्राण सोडला. निराधार झालेल्या त्या वासराला दुसऱ्या एका जर्सी जातीच्या गाईने जवळ केले. आपले दूध त्याला पाजू लागली. मायेने चाटून त्याला आईचे प्रेमही देऊ लागली. ते वासरू आता बरेच मोठे झाले आहे. ही घटना राजू शर्मा यांच्याच शेतातील आहे.