शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ कीटकनाशके बनावट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 23:29 IST

सोयाबीन व कापसावर विविध कीडींचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांनी कीडकनाशकांचा सर्रास वापर सुरू केला आहे. मात्र यातील बहुतांश कीडकनाशकांची नावे शिफारस केलेल्या यादीत समाविष्ट नसल्याचे पुढे आले आहे.

ठळक मुद्देपिकांचे होणार नुकसान : शिफ ारस नसलेल्या कीटकनाशकांचा वापर सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: सोयाबीन व कापसावर विविध कीडींचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांनी कीडकनाशकांचा सर्रास वापर सुरू केला आहे. मात्र यातील बहुतांश कीडकनाशकांची नावे शिफारस केलेल्या यादीत समाविष्ट नसल्याचे पुढे आले आहे. याशिवाय कीडकनाशकांच्या मिश्रणांचीही विक्री सुरू असताना अद्याप तक्रारी का केल्या जात नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.मागील वर्षी खरीप हंगामात कीटकनाशकांची हाताळणी करताना शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झाल्याच्या घटना घडल्या होत्या. जिल्ह्यातही वरोरा, कोरपना, राजुरा, जिवती, गोंडपिपरी व भद्रावती तालुक्यात विषबाधा झाली होती. त्यामुळे कीडनाशकांची फवारणी करताना जीवितहाणी होऊ नये, यासाठी कृषी विभागाने जनजागृती मोहीम सुरू केली. यावर्षी मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. बदलत्या हवामानामुळे यंदा कापूस व सोयाबिनवर विविध कीडींनी हल्ला केला. धानपिकावर लष्कर अळी तर कापसावर बोंड अळीने आक्रमण केल्याचे दिसून येते. यामुळे शेकडो शेतकरी कृषी केंद्रांमधून विविध प्रकारची किडकनाशके खरेदी करीत आहेत.विकत घेतलेल्या कीटकनाशकांची तिव्रता आणि कीड रोगांना प्रतिबंधक करण्याची क्षमता किती, यासंदर्भात कीडकनाशक कायद्यानुसार शिफारशी करण्यात आल्या आहेत. कापसाकरिता यंदा १०४ तसेच सोयाबिनसाठी १८ कीटकनाशकांची शिफारस करण्यात आली आहे. परंतु शासनाच्या यादीत नसलेल्या सुमारे ६० कीटकनाशकांची विक्री होत, अशी माहिती शेतकºयांनी दिली. कोरपना, राजुरा, भद्रावती व वरोरा तालुक्यात हा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने या हंगामात जिल्हानियहाय पीक पद्धतीनुसार नोंदणीकृत व शिफारस केलेल्या कीटकनाशकांच्या विक्रीवर नियंत्रण आणण्याचे धोरण जाहीर केले. या धोरणानुसारच कीटकनाशकांची यादी राज्याच्या कृषी आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठविली. पण, यादीबाहेरील कीटकनाशके कृषी केंद्रमध्ये आलीच कशी, असा प्रश्न जागृत शेतकरी विचारत आहेत.६० कीटकनाशकांची चौकशी कराजिल्हानिहाय पीक पद्धतीनुसार सोयाबिनकरिता १८ व कापसाकरिता १०४ कीटकनाशकांची यादी यंदाच्या खरीप प्रकाशित करण्यात आली आहे. या कीटकनाशकांची विक्री व वापर करण्यासाठी शेतकºयांना प्रोत्साहन देत असल्याचा दावा कृषी विभागाने केला. परंतु या यादीव्यतिरिक्त सुमारे ६० कीटकनाशकांची विक्री सुरु आहे. यासंदर्भात अद्याप तक्रारी झाल्या नाहीत. परंतु ‘लोकमत‘ च्या पाहणीनुसार काही कृषी केंद्रांमध्ये ही कीटकनाशके उपलब्ध आहेत. त्यामुळे संबंंिधत विभागाने चौकशी करण्याची माणगी शेतकऱ्यांनी केली आहे.कीटकनाशकांचे कायदे कागदावरचकेंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती फरिदाबाद यांनी शिफारस केलेल्या कीटकनाशकांचा वापर करणे कीटकनाशक कायदा १९६८ तसेच कीटकनाशके नियम १९७१ तरतुदीनुसार बंधनकारक आहे. फरिदाबद येथील केंद्रीय कीटकनाशक मंडळ देशातील सर्वोच्च शासकीय संस्था आहे. या मंडळात नोंदणी केलेल्या कीटकनाशकांनाच उपत्पादन, साठवणूक, प्रदर्शन व विक्रीसाठी परवानगी दिली जाते.