शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ वाघीण वनकर्मचाऱ्यांच्या नजरकैदेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 23:15 IST

चार पिल्लांसह गिरगाव परिसरात ठाण मांडून असलेली ‘ती’ वाघीण वन कर्मचाऱ्यांच्या नजरकैदेत आहे. यासाठी आठ ते दहा वनकर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देगिरगाव परिसरातील गावकऱ्यांत दहशत : बेशुद्ध करून पकडण्याची परवानगी देण्याला नागपूर कार्यालयाकडून विलंब

आॅनलाईन लोकमतनागभीड : चार पिल्लांसह गिरगाव परिसरात ठाण मांडून असलेली ‘ती’ वाघीण वन कर्मचाऱ्यांच्या नजरकैदेत आहे. यासाठी आठ ते दहा वनकर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तिला हुसकावण्यासाठी अनेक प्रयत्न कर्मचाऱ्यांकडून केले जात असले तरी ती हलत नसल्याने वनकर्मचाऱ्यांना सतत पहारा द्यावा लागत आहे.गेल्या पंधरा दिवसांपासून गिरगावजवळ एका वाघिणीने तिच्या ४ पिलांसह ठाण मांडले आहे. तिने या परिसरातील दोन गोऱ्यांना ठार करून दोन शेतकऱ्यांवरही हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शेतकऱ्यांत चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.जंगलानजिकच्या शेतकऱ्यांना शेतावर जाणे कठीण झाले आहे. ही बाब लक्षात घेता वाघिणीचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली. त्यानंतर वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही वाघिणीचा बंदोबस्त करा, असे निर्देश वनाधिकाऱ्यांना दिले.वाघिणीच्या बंदोबस्तासाठी तळोधी वनपरिक्षेत्र कार्यालयाने बेशुद्ध करून तिला पकडण्याची परवानगी नागपूर कार्यालयाकडून मागितली आहे. मात्र परवानगी अद्यापही मिळालेली नसल्याने वाघिणीला वनकर्मचाºयांच्या नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. यासाठी वाघिणीने ज्या परिसरात ठाण मांडले आहे, त्या परिसरात आठ ते दहा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.तैनात कर्मचाऱ्यांच्या तुकड्या पाडण्यात आल्या असून यापैकी काही कर्मचारी दिवसा तर काही रात्रपाळीत तैणात असतात. वनपरिक्षेत्रधिकारी अभिलाषा सोनटक्के यांचीही नजर असून वाघिण गावाच्या दिशेने येऊ नये, यासाठी कर्मचाऱ्यांकडून फटाकेही फोडण्यात येत आहेत. मात्र वाघिण आपल्या जागेवरच पिल्ल्यांसह ठाण मांडून आहे.तहसीलदारांच्या उपस्थितीत बैठकगिरगाव : ठाण मांडून बसलेल्या वाघिणीच्या बंदोबस्तासाठी मंगळवारी गिरगाव ग्रामपंचायत भवनात नागभीडचे तहसीलदार समीर माने व ठाणेदार श्रीकांत पांढरे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला सरपंच प्रशांत गायकवाड, उपसरपंच शरद सोनवाने, पोलीस पाटील जीवन बोरकर, उमेश बोरकर आदी उपस्थित होते. यावेळी तहसीलदारांनी कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी गावकऱ्यांनी सहकार्य करावे, वाघिणीच्या बंदोबस्तासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच बंदोबस्त केला जाईल, असे आश्वासन बैठकीला उपस्थित गावकºयांना दिले.घटनास्थळावर बघ्यांची गर्दीवाघिण चार पिल्लांसह ठाण मांडून आहे, ही माहिती सर्वदूर पसरली. त्यामुळे वाघिणीला बघण्याच्या हेतूने अनेक नागरिक येथे गर्दी करू लागले आहेत. ही बाबही अडचणीची ठरत आहे.वनतस्करांची भीतीसंपूर्ण तळोधी वनपरिक्षेत्रातील वन कर्मचाऱ्यांचे लक्ष वाघिण व तिच्या पिल्लांकडे केंद्रीत झाले आहे. परिणामी कर्मचाऱ्यांचे त्यांच्या दैनंदिन कामाकडे दुर्लक्ष होऊ शकते. याचा फायदा वनतस्कर घेण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.