शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

सराफा लाईनमध्ये शुकशुकाट

By admin | Updated: March 4, 2016 00:56 IST

शासनाने सराफा व्यावसायिकांसाठी एक टक्का उत्पादन शुल्क लावल्याने सोने खरेदी-विक्री व्यवहारावर परिणाम होणार आहे.

बंदचा परिणाम : कोट्यवधींची उलाढाल ठप्पचंद्रपूर : शासनाने सराफा व्यावसायिकांसाठी एक टक्का उत्पादन शुल्क लावल्याने सोने खरेदी-विक्री व्यवहारावर परिणाम होणार आहे. या निर्णयाच्या विरोधात देशभरातील सराफा व्यावसायिकांनी तीन दिवस बंद पुकारला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे दोनशे ते अडीचशे सराफा दुकाने बंद असल्याने कोट्यवधींची उलाढाल ठप्प पडली आहे. याशिवाय ऐन लग्नाच्या हंगामात चंद्रपुरातील गजबजलेल्या सराफा लाईनमध्ये शुकशुकाट पसरला आहे.शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार एखाद्या ग्राहकाने दोन लाखांची सोने खरेदी केली तर त्याला पॅनकॉर्ड दाखवावे लागणार आहे. याशिवाय उत्पादन शुल्क एक टक्का आकारण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. यामुळे सोने खरेदी-विक्री व्यवहारावर विपरित परिणाम होणार आहे, असे चंद्रपूर सराफा असोसिएशनचे अध्यक्ष सत्यम सोनी यांनी म्हटले आहे. शासनाच्या या निर्णयाविरोधात सराफा व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. चंद्रपूर शहरात सुमारे ७० सराफा दुकाने आहेत. जिल्ह्यात या दुकानांची संख्या दोनशे ते अडीचशेच्या घरात आहे. दररोज या दुकानातून कोट्यवधींची उलाढाल होते. २ मार्चपासून जिल्ह्यातील सराफा दुकाने बंद असल्याने कोट्यवधींची उलाढाल ठप्प पडली आहे. चंद्रपुरातील गिरनार चौक ते गांधी चौक मार्गावर सराफा व्यावसायिकांची चाळच आहे. जिल्हाभरातील ग्राहक येथे येत असल्याने नेहमी हा परिसर गजबजलेला राहतो. मात्र मागील दोन दिवसांपासून या परिसरात शुकशुकाट पसरला आहे. विशेष म्हणजे, सध्या लग्न सराईचे दिवस सुरू झाले आहेत. त्यामुळे या दिवसात सोने-चांदीच्या दागिन्यांची जोरात खरेदी होत असते. मात्र सतत तीन दिवस ही दुकाने बंद असल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. (शहर प्रतिनिधी)