शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

शकीलच्या घरी वाहतेयं दुधाची गंगा

By admin | Updated: August 12, 2016 01:18 IST

घरी दुधाची गरज म्हणून त्याने एक गाय विकत घेतली. पण आता तोच त्याचा व्यवसाय झाला आहे.

बेरोजगारीवर मात : शेतकऱ्यांसाठीही एक आदर्श घनश्याम नवघडे नागभीड घरी दुधाची गरज म्हणून त्याने एक गाय विकत घेतली. पण आता तोच त्याचा व्यवसाय झाला आहे. आता एक नाही तर तब्बल ४५ म्हशी, सात गायी, २५ बकऱ्या त्यांच्या घरी असून तो आता नागभीड तालुक्यातील एक प्रमुख दुध उत्पादक म्हणून गणला जात आहे. शेतीला पुरक जोडधंदा करणाऱ्यांसाठी त्याने एक आदर्श निर्माण केला आहे. शकील शौकत शेख असे या दुध उत्पादकाचे नाव असून तो नागभीड येथील रहिवासी आहे. घरी दुधाची गरज म्हणून त्याने एक गाय विकत घेतली. ती गाय दररोज आठ लीटर दूध द्यायची. घरी एवढ्या दुधाची गरज नाही म्हणून तो उर्वरीत दुध विकू लागला. त्यातून घरखर्च निघू लागला. त्याने विचार केला आपण हाच व्यवसाय केला तर? त्याने मनाशी ठाणले. आणि एक एक म्हैस, गाय ता ेविकत घेवू लागला. या सहा वर्षात शकीलने अनेक गायी, म्हशी विकत घेतल्या. शकीलकडे आज ४५ मुर्श, कोचर जातीच्या म्हशी, होस्टन, जर्सी जातीच्या सात गायी आणि अजमेरी, जमनापरी जातीच्या २५ बकऱ्या आहेत. या गायी-म्हशी पासून शकील रोज २७० ते २८० लीटर दुधाचे उत्पादन करतो. उत्पादीत झालेले दुध तो येथील सर्व मोठ्या हॉटेल्सना पुरवितो. दुधात गुणवत्ता असल्याने त्याने उत्पादीत केलेल्या दुधाला ४० ते ५० रुपये लीटर भावही मिळत आहे. या गायी म्हशीच्या देखभालीसाठी त्याने नियमित सात व्यक्ती ठेवल्या आहेत आणि प्रत्येकाला कामही नेमून दिले आहे. साधारण आपल्या भागातील दुध उत्पादक वैरणासाठी तणसाचा वापर करतात. पण शकील तणसाचा वापर फार कमी प्रमाणात करतो. तो कुटार आणि गव्हाडा वापरतो. या व्यवसायातून शकीलने चांगलीच आर्थिक प्रगती साधली आहे. मजूर खाद्य आणि औषधी यांचा खर्च वजा जाता महिन्याकाठी त्याला लाख रुपयाचा फायदा होत आहे. शकीलला आता पशुधनाचा बराच अभ्यास झाला आहे. या पशुधनावर हलके-फुलके आजार उद्भवल्यास तो स्वत:च त्यांच्यावर उपचार करतो. मात्र गंभीर आजार दिसून आल्यास येथील डॉक्टरांकडे घेवून जातो. खरे तर दुध उत्पादनासाठी नागभीड तालुका संपूर्ण जिल्ह्यात अग्रेसर आहे. पण ही ओळख हळूहळू कमी होत आहे. नैसर्गिक पार्श्वभूमी उपलब्ध असूनही केवळ निरुरस्साहामुळे या तालुक्यातील पशुधन दिवसेंदिवस कमी होत आहे. शकीलचा आदर्श समोर ठेवून या तालुक्यातील तरुणांची पशुधनास व्यवसाय म्हणून स्विकारले तर बेरोजगारीवर मात करता येईल.