शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

स्वातंत्र्यसंग्राम सैनिकाच्या लेखनीतून साकारतोय शहीद ‘बाल्या ढीवर’

By admin | Updated: July 9, 2016 01:13 IST

भारतावर दिडशे वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रजाची जुलमी राजवट देशातील लहाण्यापासून वृद्धापर्यंत परिचीत असून ....

मिंझरी येथील पहिला शहीद : १८ नोव्हेंबर १९२९ ला लटकवले होते फासावरराजकुमार चुनारकर चिमूरभारतावर दिडशे वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रजाची जुलमी राजवट देशातील लहाण्यापासून वृद्धापर्यंत परिचीत असून या जुलमी राजवटीचे नावही काढल्यास चिमूरकरांच्या अंगावर काटा उभा राहतो. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात देशात मोठे योगदान देणाऱ्या चिमूर शहरात तथा परिसरात अनेक शहीद वीरांच्या अर्धांगिनी व स्वत: स्वातंत्र संग्राम सैनिक जिवंत आहेत. त्यापैकी ९३ वर्षीय स्वातंत्र संग्राम सैनिक दामोधर लक्ष्मण काळे (गुरुजी) यांच्या लेखनीतून चिमूर तालुक्यातील दीडशे लोकसंख्या असलेल्या मिंझरी येथील पहिला शहीद ‘बाल्या ढीवर’ यांचा इतिहास साकारणार आहे.भारताच्या स्वातंत्र लढ्यात चिमूर शहराचे योगदान मोठे आहे. १६ आॅगस्ट १९४२ चा स्वातंत्र संग्राम लढ्यात चिमुरातील अनेक स्वातंत्र विरांनी व महिलांनी मोठ्या संख्येत सहभाग घेतला. चिमूरच्या स्वातंत्र लढ्यात अनेक जुलमी इंग्रज अधिकाऱ्यांचे मुद्दे पाडण्यात आले व इंग्रजाची सत्ता उलथवून लावली व देशात प्रथम तिन दिवस स्वातंत्र उपभोगले. त्यामुळे चिमूर शहराचे नाव देशात अजरामर आहे.१६ आॅगस्ट १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये चिमूर येथील बहिनीकडे आलेल्या युवा अवस्थेतील लक्ष्मण काळे यांनी स्वातंत्र लढ्यात सहभाग घेत चिमूरकरांना इंग्रजाच्या राजवटीतून मुक्त केले. यानंतर काळे गुरुजींनी अनेक आंदोलने चिमूर जिल्ह्याची मागणी शासन दरबारी रेटून धरली आहे. जेव्हा-केव्हा चिमूर जिल्हा होईल, तेव्हा काळे गुरुजी यांचे नाव इतिहासात कोरले जाणार आहे.स्वातंत्र संग्राम सैनिक काळे गुरुजी यांच्या लेखनीतून आता वयाच्या ९३ व्या वर्षी चिमूर तालुक्यातील मिंझरी (मुरपार) या गावातील तालुक्यातील पहिला शहीद ‘बाल्या ढीवर’ याचे आत्मचरित्र असलेले पुस्तक येत्या १६ आॅगस्टला स्वातंत्र संग्राम लढ्याच्या दिवशी प्रकाशित करण्यात येणार आहे. तालुक्यातील पहिला शहीद बाल्या ढिवर यांना १८ नोव्हेंबर १९२९ ला उमरेड येथील किल्ल्यावर इंग्रजांनी फासावर लटकवले. याच तालुक्यातील दिडशे लोकसंख्या असलेल्या मिंझरी (मुरपार) गावातील बाल्या ढीवर हा चिमूर तालुक्यातील पहिला शहीद ठरला आहे. या शहीद बाल्या ढिवराचे आत्मचरित्र चिमूर स्वातंत्र संग्राम स्वातंत्र लढ्यातील सैनिक काळे गुरुजी यांच्या लेखनीतून ‘शहीद बाल्या ढीवर’ हे पुस्तक साकारणार आहे.